कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे मंगळवारी(ता.6) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच रत्नसंभव बुद्धविहारात भीमज्योत नवयुक मंडळाच्या वतीने एक दिवशीय धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तथा अस्पृश्यता निवारण व सामाजिक विषमता याबाबद माहिती देण्यात आली.
नवसामाजाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध असणे हे डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांचे ध्येय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने या ध्येयाशी अधिकाअधिक प्रमाणिकता राखता यावी म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघ केन्द्र भंडारा तर्फे गडेगांव येथे एक दिवशीय धम्मशिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे नेतृत्व धम्मचारी विवेकप्रभ वर्धा, सह धम्मचारी आर्यानंद वर्धा , धम्मचारी बुध्दरत्न नागपूर यांनी केले असून, संचालन गणेश नंदेश्वर तर आभार प्रदर्शन जितेंद्र भैसारे यांनी केले. या शिबिरात तब्बल ९ गावातून १०६ शिबीरार्थी उपस्थित झाले होते. किन्ही , गडेगाव, मलकाझरी, गुंथारा , माडगी, लाखनी, सावरी, साकोली, भंडारा. तसेच अनेक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या