Ticker

6/recent/ticker-posts

कुऱ्हाडीचे घाव घालून इसमाची निर्घृण हत्या


लाखनी तालुक्यातील कोलारा/झरप रस्त्यावरील घटना 

संशयित म्हणून सख्खा भाऊ व पुतण्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324


भंडारा :-लाखनी तालुक्यातील पालांदुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोलारा शेतशिवारात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळल्याची घटना बुधवारी(ता.७) सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी मृतकाचे सख्खा भाऊ व पुतण्यास संशयित म्हणून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळास भेट दिली. गुन्ह्याची उकल करण्यास स्वान पथकास पाचारण करण्यास आले. मृतकाचे नाव प्रभाकर(प्रभू) उदाराम भोयर(५०) रा. कोलारा, तालुका लाखनी तर संशयितांची नावे सुरेश उदाराम भोयर(५५) व कमलेश सुरेश भोयर(३०) रा. कोलारा अशी आहेत. वृत्त लीहीपर्यंत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. 
            मृतक प्रभू सकाळचे सुमारास शेतावर गेला होता. आणि पाळीव जनावरांसाठी वैरण घेऊन घरी आला. सकाळचे सुमारास गार वाऱ्यामुळे थंडी अधिक असल्यामुळे दुकानालगत शेकोटी जवळ बसला हात शेकुन परत शेताकडे जाण्यास निघाला असता काही वेळाने त्याचा कोलारा झरप रस्त्यावर मधोमध रक्तरंजित मृतदेह व मृतदेहालगत स्टँड वर ठेवलेली सायकल एका गावकऱ्यास दिसून आल्याने गावात येऊन सांगितले असता घटनास्थळावर बघ्यांची गर्दी जमा झाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे, पोलिस उपनिरीक्षक श्यामराव चाचेरे, सहाय्यक फौजदार ओमप्रकाश केवट, पोलिस शिपाई नाविद पठाण यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहासभोवताल असलेली गर्दी बाजूला सारून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र मिळते का. याचा शोध सुरू केला असता लगतच्या नालीत वाढलेल्या झाडाझुडपात खूनाने माखलेली कुऱ्हाड दिसून आली. हत्येचा प्रकार असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. तथा श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. 
             श्वान पथकाने कुऱ्हाडीचा वास घेऊन शेतशिवारातून सरळ मृतकाचे भावाच्या घरी पोहचला. श्वान पथका पाठोपाठ पोलिस पथकही घरी आले व घरात दडून बसलेल्या मृतकाचे भाऊ सुरेश भोयर व पुतण्या कमलेश भोयर यांना ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस उपअधीक्षक(गृह) विजय डोळस, साकोली चे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस ठाण्यात संशयितांची विचारपूस केली. मृतक आणि संशयितांमध्ये शेतीबाबद वाद असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पालांदूर पोलिसांनी सर्व सोपस्कार(पंचनामा) पार पडून मृतदेह उत्तरीय परिक्षणाकरिता ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले. शवपरिक्षणांतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतक प्रभाकर(प्रभू) च्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकास पत्नी, १ मुलगा व मुलगी आहे. वृत्त लीहिपर्यंत पालांदूर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या