Ticker

6/recent/ticker-posts

खर्डा चौकातील इमाम शहावली दर्गा व दोन्ही कब्रस्थान येथे लाईटची सोय करावी, रमेश आजबे यांची नगरपरिषदेकडे मागणी.

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098


 अहमदनगर :- 03/12/2022
 जामखेड नगर परिषद हद्दीतील खर्डा चौकातील इमाम शाहा बली बाबा दर्गा व चौकामधील दोन्ही कब्रस्तान मध्ये लाईटची कोणतीही सोय नसल्याने तेथे येणाऱ्या लोकांना त्रास होत असल्याने या तिन्ही ठिकाणी आवश्यक ती लाईटची सोय करावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी केली आहे. या बाबत त्यांनी नगर परिषद प्रशासनास पत्रही दिले आहे. 
     खर्डा चौकामधील उजव्या आणि डाव्या बाजूला जे दोन्ही कब्रस्तान आहेत त्या कब्रस्तान मध्ये लाईटची समस्या जाणवत आहे त्यानुसार. नगरपरिषद जामखेड यांच्याकडे दोन्ही कब्रस्तान मध्ये चांगल्या प्रकारची लाईट बसवण्यात यावी यासाठी नगरपरिषदेला निवेदन सादर केलेले. त्यानुसार लवकरात लवकर लाईट बसून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आल्याची माहिती रमेश आजबे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या