Ticker

6/recent/ticker-posts

जामखेड शहरात लंपी स्किन सदृश्य जनावरे फिरत आहेत मोकाट प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष. बंदोबस्त करण्याची शहरातील नागरिकांची मागणी.

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :- 03/12/2022
जामखेड शहरात जनावरांमध्ये घातक ठरलेल्या लंपी स्किन सदृश्य जनावर फिरत असून याकडे प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. जनावरांच्या या आजाराबाबत शासन इतके गंभीर असताना नगरपरिषद प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करत आहे. ही मोकाट जनावरे नागरीवस्ती मध्ये अगदी राजरोस फिरत आहेत.
     आतापर्यंत राज्यातील हजारो जनावरांना लागन होऊन मोठ्या प्रमाणात जनावरांचा जीव घेतलेल्या रोगामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत सापडला आहे. लंपी स्किन नियंत्रणात आणण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करत आहे. जामखेड येथे मोठ्या प्रमाणावर भरणारा जनावरांचा बाजारही यामुळे बंद केला आहे. मात्र जामखेड नगरपरिषद किंवा लंपी स्किन आजाराशी संबंधित यंत्रणा जामखेड शहरातील मोकाट फिरणाऱ्या जनावरांबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही. आज दि. ३ डिसेंबर रोजी तपनेश्वर भागात अशीच एक लंपी स्किन आजाराची लक्षण दिसणारी गाय घरोघरी फिरत असल्याचे आढळून आले आहे. ती गाय दारात ठेवलेल्या भांड्यातील पाणी पीताना तीच्या तोंडातील लाळ व फेस त्या भांड्यामध्ये पडत आहे.
 अशाऊ मोकाट जनावरांमुळे जर लंपी स्किन आजाराचा फैलाव वाढत गेला तर अनेक पशुपालक व शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक होऊ शकते. त्यामुळे या समस्येवर वेळीच उपाय योजना करावी व येणाऱ्या अडचणीपासून पशुपालक व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे आशी मागणी जामखेड शहरवासीयांमधून होताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या