Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाचे मार्फत आर बी दयावान संस्थेच्या प्रयत्नाला यश भवानी पेठ परिसरामधील सार्वजनिक शौचालयाला साडेआठ लाख रुपये निधी मंजूर

    
मिलिंद गायकवाड उपसंपादक महा , चित्रा न्यूज मो , 9860179256

 सोलापूर :- दिनांक 2 डिसेंबरभवानी पेठ परिसरामधील मराठा वस्ती मुकुंद नगर राजीव गांधी नगर भागामध्ये हजारो संख्येने लोक राहत आहेत अशा दाट लोक वस्तीमध्ये गेल्या 60 वर्षांपूर्वी सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते त्यानंतर यावर कोणतेही नगरसेवकांनी लक्ष व प्रतिक्रिया दिले नाही या सार्वजनिक शौचालेचे दुरावस्था विस्कळीत झाले होते व यामधून दुर्गंधी व चेंबर भरून लोकांच्या घराघरांमध्ये शौचालयाचे घाण पाणी जात होते परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला लहान मुले व वयोवृद्ध या शौचालय मध्ये जात असतात त्यामुळे येथे राहत असणाऱ्या लोकांच्या आरोग्यास धोका हे नाकारता येत नाही याचा विचार करून आर बी दयावान संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर, विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे, दादा सरवदे,यानी दिनांक 17/1/2021 रोजी निवेदन देण्यात आले होते व याचा सातत्याने पाठपुरावा करून आज रोजी साडेआठ लाख रुपये निधी मंजूर होऊन काम चालू झाले आहे सर्व नागरिकांचा प्रश्न सुटला आहे तरी महानगर पालिका प्रशासनाचे व आर बी दयावान संस्थेचे आभार सर्व नागरिकांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या