Ticker

6/recent/ticker-posts

योग्य मार्गदर्शन व अभ्यासातील सातत्य कायम ठेवले तर कोणत्याही स्पर्धेत आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही : पोलीस निरीक्षक मा.संभाजी गायकवाड

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-:02/12/2022
           योग्य मार्गदर्शन व अभ्यासातील सातत्य कायम ठेवले तर कोणत्याही स्पर्धेत आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच काम गेली अनेक वर्षांपासून शिवनेरी अकॅडमी येथे होत असल्याने १५० च्या वर विद्यार्थी विविध संरक्षण दलात भरती झाले आहेत. असे प्रतिपादन जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
आज दि. २ डिसेंबर रोजी सकाळी जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जामखेड येथिल शिवनेरी अकॅडमीतील सर्व बहादूर विद्यार्थ्यांना सुंदर असे स्पर्धा परीक्षा बद्दल मार्गदर्शन केले व येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्वांना भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवनेरी अकॅडमीचे संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे, प्रा. गणेश पवार व अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे शिवनेरी अकॅडमीच्या वतीने त्यांचे स्वागत केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या