दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
नागपूर :-चोरट्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीतून ६० हजार रुपये किमतीचे शास्त्रीय व गणितीय साहित्य चोरून नेले . ही घटना काटोल शहरात गुरुवारी ( दि . २१ ) सकाळी उघडकीस आली . काटोल शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय इमारतीच्या परिसरात कुणीही नसताना साहित्य ठेवलेल्या खोलीच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्याने आत प्रवेश केला . यात त्याने आत ठेवलेले ६० हजार रुपये किंमतीचे शास्त्रीय व गणितीय उपकरणांचे 33 नग चोरून नेले .


0 टिप्पण्या