दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
मुंबई :-भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी , शिवाजीपार्क अशी विशेष बस सेवा चालवली जाणार आहे . मुंबई परिसर तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या अनुयायांसाठी ५ ते ७ डिसेंबर पर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे . तसेच चैत्यभूमी शिवाजी पार्क , राजगृह आदी परिसरात दरवर्षीप्रमाणे विद्युत पुरवठा केला जाणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली . - चैत्यभूमी फेरी विशेष बससेवा डॉ . बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात . या अनुयायांना मुंबई महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाकडून ५ डिसेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत विविध सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात . महापरिनिर्वाण दिनानिमित्तबेस्ट सज्ज मुंबई परिसरातून तसेच बाहेरगावाहून येणा - या प्रवाशांसाठी दादर स्थानक ते शिवाजी पार्क मैदान चैत्यभूमी येथे जाण्याकरीता " चैत्यभूमी फेरी " या नावाने अतिरिक्त बसफेऱ्या चालवल्या जाणार आहेत . ५ डिसेंबर दुपारी ४ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत तीन बसेस तर ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ रात्री १० वाजेपर्यंत , तसेच ७ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी दोन वाजेपर्यंत तीन बसेस चालवण्यात येणार आहेत .या व्यतिरिक्त सोमवारी , ५ डिसेंबर रोजी रात्री ९ .३० ते मध्यरात्रीपर्यंत बसक्रमांक २०० , २४१ , ३५१३५४ वर १० बसगाड्या चालवण्यात येतील . तर ६ डिसेंबर रोजी बसक्रमांक ४४० , सी -३३ , १६४ , २४१ , सी ३०५ , ३५१ , ३५४ , ओ ३८५ आणि सी ५२१ या बसमार्गावर एकूण ३५ जादा बसगाड्या चालवल्या जाणार असल्याची माहिती लोकेशचंद्र यांनी दिली . १५० रुपयांत मुंबई दर्शन - डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मृतीस्थळांना , दक्षिण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याकरीता बेस्टने बुधवारी , ७ डिसेंबर रोजी सकाळी ७. ३० ते ९ . ३० पर्यंत अरिरिक्त बसगाड्या चालवल्या जाणार आहेत . शिवाजी पार्क येथून ६ अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जाणार आहेत . या बसगाड्यांचे प्रतीप्रवासी १५० रुपये प्रवास भाडे असेल . तसेच नवी मुंबई , ठाणे , मीरा भाईंदर येथील विविध भागांना भेट द्यावयाची असल्यास त्यासाठी दैनंदिन बसपासची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . सदर पासचे शुल्क ५० , ६० रुपये असून ते चलो स्मार्ट कार्ड शिवाय देखील ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत कोणत्याही बसमार्गावरील बसवाहकाकडे उपलब्ध केले जाणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले . अखंडित विद्युत पुरवठा दादर शिवाजी पार्क चैत्यभूमी परिसरात मंडप , तंबूना वीज पुरवठा , दिव्यांच्या देखभालीसाठी एरियल लिफ्ट , वॉकीटॉकीने सुसज्ज असलेली पथके तैनात करण्यात आली आहे . तसेच बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागातर्फे विविध ठिकाणी मार्गप्रकाश दिवे बसवण्यात येणार आहेत . चैत्यभूमी ते शिवाजीपार्क , दादर चौपाटी , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राजगृह , आंबेडकर कॉलेज , दादासाहेब फाळके रोड , मादाम कामा रोड आदी ठिकाणी १५० वॅटचे ३५५ , २ केव्हीचे ४ अतिरिक्त दिवे बसविले जाणार आहेत . अखंडीत वीज पुरवठा ठेवण्याकरीता बेस्टकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे .बेस्टची व्यवस्था - चैत्यभूमी , शिवाजी पार्क , दादर चौपाटी , राजगृह आंबेडकर कॉलेज , दादासाहेब फाळके रोड व मादाम कामा रोड आदी ठिकाणी अतिरिक्त मार्गप्रकाश दिवे , वीज पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी ६२. ५ के . व्हि ए क्षमतेचे जनरेटर्स , दादर चौपाटी , महापौर निवास व ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी ६ किलो वॅट क्षमतेच्या सर्च लाईट्स विशेष मनोऱ्या बसवले जाणार , दिव्यांच्या देखभालीसाठी एरियल लिफ्ट , वॉकी टॉकीने सुसज्ज असलेली पक्षके तैनात करण्यात येणार आहेत .


0 टिप्पण्या