दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885
धुळे: - मध्यप्रदेश राज्यातील रतलाम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आणलेले ट्रॅक्टर कांदा व ट्रॉलीसह चोरून नेणाऱ्या दोघा चोरट्यांचा धुळे एलसीबी आणि शिरपूर शहर पोलीसांच्या संयुक्त पथकाने मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील दहिवद जवळ पाठलाग करीत ट्रॅक्टर सह ताब्यात घेतल्याची कारवाई केली आहे . सुनील जगदीश पवार वय 22 आणि विकास दिनेश राठोड वय 18 ( रा . डिंकवा , ता . जि . रतलाम , मध्य प्रदेश ) या दोघांना ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले . याबाबत सविस्तर असे की , रतलाम जिल्ह्यातील बारबोदना येथील समरथ बाबूलाल जाट या शेतकऱ्याचे रतलाम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5 डिसेंबर रोजी रात्री कांदा विक्रीसाठी ट्रॅक्टर उभे केले होते . बाजार भाव दुसऱ्या दिवशी होणार असल्याने रात्री प्लास्टिक कागद ट्रॉलीवर टाकून घरी निघून गेले . याच संधीचा फायदा घेत आवारातून संशयितांनी ते पळवून नेले .सदर घटना 6 डिसेंबर रोजी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही वरून उघड झाली . याप्रकरणी समरथ जाट यांनी रतलाम स्टेशन रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयातीणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला . रतलाम पोलिसांनी तपास सुरू केला असता मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून सदर ट्रक्टर महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे आढळून आल्याने मध्यप्रदेश पोलिसांनी तात्काळ धुळे पोलीस दलाशी संपर्क साधला माहिती दिली . मिळलेल्या माहितीनुसार धुळे एलसीबी व शिरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने दहिवद जवळ सापळा रचला असता संशयितांनी ट्रक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न केला . पथकाने पाठलाग करीत ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले . ट्रॅक्टर मधील कांदा मात्र आढळून आला नसल्याने दोघा संशयीतांनी रस्त्यात कुठेतरी कांदाविक्री केला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे . सदर दोघां संशयितांना ट्रॅक्टर ट्रॉलीसह रतलाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले . सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड , अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे , एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर , शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए . एस . आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश फड , पीएसआय संदीप मुरकुटे , पीएसआय गणेश कुटे , पोना उमाकांत वाघ , नरेंद्र शिंदे , एलसीबीचे कमलेश सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली .


0 टिप्पण्या