Ticker

6/recent/ticker-posts

ऑटो उलटला , १२ विद्यार्थ्यांसह चालक जखमी

दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885

अकोला :-सांगोळा येथून वाडेगाव येथे शाळेत जात असताना विद्यार्थ्यांचा ऑटो उलटल्याने १२ विद्यार्थी व चालक किरकोळ जखमी झाले . ही घटना दिग्रस तुंलगा रस्त्यावर घडली . पोलिस भरतीची तयारी करीत असणारे प्रतीक गवई सम्राट गवई , मेजर विशाल लहाने , अतुल गवई , राज चिकटे , अभी चिकटे , प्रदीप टिकार , गौरव दाबेराव , हृतिक गवई , अजय गवई , कपिल गवई , शुभम ताले आदींच्या नजरेस पडली . त्यांनी धावाधाव करून जखमी असलेल्या विद्यार्थ्यांना उचलून तत्काळ वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठविले . त्यानंतर वाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता गायगोळ यांनी प्राथमिक उपचार करून काहींना घरी पाठविले तर चालक व २ विद्यार्थ्यांना अकोला येथे पाठविण्यात ऑटो चालकाजवळ दाटीवाटीने विद्यार्थी बसले असल्याने वाहन उसळून उलटल्याची माहिती आहे . यामधील जवळपास १० ते १२ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या