Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार!


जळगाव महापालिकेचा भोंगळ कारभार!

जळगाव शहरातील प्रभाग नंबर ७ मधे आंबेडकर गार्डन आहे.गणेश कॉलनी तील  हजारो नागरिक येथे रोज सकाळी, संध्याकाळी फिरण्यासाठी येतात.पण येथे तर गेट जवळच चिखल केलेला आहे.कोणी केला हा चिखल? या गार्डनमध्ये महानगरपालिकेचे बोअर आहे.येथून अडचणीच्या वेळी पाणीपुरवठा केला जातो.पण यावर कोणाचेही नियंत्रण नाही.येथून महानगरपालिका व्यतिरिक्त कोणीही पाणीचे टॅंकर भरतात पण पावतीचे पैसे देत नाहीत.का? हे महानगरपालिकेचे उत्पन्न बुडते आणि चोर धड होतात.हा भोंगळपणा आहे कि अपहार? नगरसेवक , महापौर, आमदार यांना कळले पाहिजे.का कळत नाही? कि, कळत असूनही वळत नाही? 
    येथे बाजूला रोझलॅंड शाळा आहे.तिकडून आलेली गटार माती टाकून बंद केली आहे.पाणीचोरांनी.हे नगरसेवक, महापौर, आयुक्त, आमदार यांना दिसत नाही का? अंधेरी नगरी चौपट राजा.टका शेर भाजी ,टका शेर खा जा.अशी खाऊगिरीचे हे ख्वाजा मियां जवळील प्रकरण आहे.महानगरपालिकेत पाकिट मिळवण्यासाठी,मक्ता मिळवण्यासाठी एकमेकांची कॉलर धरणारे नगरसेवक येथे चूप का?कोणी कोणाची कॉलर पकडली ? सब एकही थालीके चट्टे पट्टे ! जळगाव महापालिका सभागृह हे सभ्य लोकांचे व्यासपिठ राहिले नसून कुस्तीचा आखाडा बनला आहे.यांना कोणत्या हाताने नमस्कार करावा?
    जळगाव मधील या प्रभागातील नगरसेवक व मतदार येथे येतात.पाहातात.टिका करतात.पण बोलण्याचे धाडस करीत नाहीत.का? मताचे पांचशे रूपये जरी दिले असले किंवा घेतले असले  तरी बोलण्याचा , तक्रार करण्याचा हक्क तर शाबूत असतोच.बोललो तर आपली अडवणुक करतील.अशी खंत नागरिकांनी बोलून दाखवली.नागरिकांना नगरसेवक व महापौरांची भीती वाटते.हे लोकशाहीचे सर्वात मोठे अपयश आहे.हे तर जंगलराज आहे.अशी भीती वाटावी असे नगरसेवक तरी का निवडून द्यावेत?म्हणजे " आपलीच मांजर आणि आपल्यालाच म्यांऊ ! आपला नगरसेवक आणि आपल्यालाच भ्यांऊ! 

.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या