Ticker

6/recent/ticker-posts

अखेर "त्या " ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा :- दिघोरी पोलिस ठाण्याचे हद्दीतील मांढळ चूलबंद रेतीघाटात ट्रॅक्टरचे चाकाखाली येऊन मजूर जागीच ठार झाल्याची घटना शनिवार(ता २१) सकाळी १०:३० वाजताचे दरम्यान घडली असता ट्रॅक्टर चालकाने अपघात करून मृतक शिवराम पैकण बरडे (३९) रा. मांढळ यास कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न पोहचविता वाहनासह पसार झाल्याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक मच्छिंद्र शंकर ठाकरे (२४) रा. राजनी, तालुका लाखांदूर , यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे .
          दिघोरी पोलिस ठाण्याचे हद्दीतील मांढळ चूलबंद रेटीघाटालगतच्या गट क्रमांक ९९० आराजी २.०७ हेक्टर आर पैकी ०.१५ आर जागेमधील मातीमिश्रित रेती उपसा व वाहतूक करण्याची परवानगी कऱ्हाडला , तालुका लाखांदूर येथील एका व्यवसायिकास देण्यात आली होती .मातीमिश्रित रेती वाहतुकीकरिता १० ते १२ ट्रॅक्टर ठेवण्यात आले असले तरी याआड नदी घाटातील रेती उपसा व वाहतूक सुरू होती.शनिवारी महसूल अधिकारी येणार असल्याची कुनकून लागताच नदीघाटात असलेल्या ट्रॅक्टरची पळापळी सुरू झाली यात स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ डीव्ही ६५७७ विना क्रमांकाच्या ट्रालीचा चालक मच्छिंद्र शंकर ठाकरे रा. राजनी याने आपले ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून मृतक शिवराम बरडे याचा अपघात करून त्याचे मरणास कारणीभूत झाला तसेच मृतकास कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत न करता किंवा घटनेची माहिती पोलिसांना न देता ट्रॅक्टर घेऊन पळून गेल्याचे मंगेश पैकन बरडे याचे फिर्यादीवरून दिघोरी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक मच्छिंद्र शंकर ठाकरे (२४) राजनी यांचेवर अपराध क्रमांक ०४/२०२३ नुसार गुन्हा दाखल केला असून कलम २७९ ,३०४(अ) भादवी तथा मोटारवाहन कायदा सहकलम १३४(अ) (ब) अन्वये पोलिस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे, पोलिस हवालदार उमेश वलके, हितेश मडावी ,पोलिस नायक रुपचंद वैद्य , घनश्याम कोडापे ,तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या