सहा महिन्यात सिमेंटचे रस्ते उखडले.
जळगाव शहरातील रस्ते मागील दहा वर्षात बनत नव्हते.आता बनले तर ते असे अल्पजिवी बनवले अणि सहा महिन्यांनंतरच उखडून बरबाद झाले.
जळगाव शहरातील प्रभाग नंबर १२ मधे अनुराग स्टेट बँक कॉलनी जवळील हा सिमेंट चा रस्ता.म्हणे हा डीपी रोड आहे. फेब्रुवारी २०२२ मधे सिमेंटचा केला ,असे हे बोर्ड दर्शवते.२० वर्षे टिकला पाहिजे होता.पण फक्त सहा महिन्यात उखडला.असे येथील महिलांनी सांगितले.म्हणे एकच दिवस पाणी टाकले.बस्स! कोणीच वाली नाही.सगळेच चोर.नगरसेवक व शहर अभियंता यांनी मक्तेदाराला फुकट सोडले असेल का? मक्तेदार म्हणतो अर्धा निधी तर या चोरांना वाटला.तर मग,मी शेती ,घर, दागिने विकून सिमेंट आणू का? तुमचेच नगरसेवक आणि शहर अभियंता ३५ टक्के कमीशन घेतल्याशिवाय आमचे पेमेंट देत नाही.आम्हाला मेहनतीचा १५ टक्के मार्जीन पाहिजे.आता ५० टक्के वजा जाता सिमेंट कसे टाकणार?
या रस्त्याची संपूर्ण माहिती जळगाव मनपा आयुक्त यांना लेखी व तोंडी स्वरूपात दिली.ते अजून फक्त मिटींग मिटींग सांगून काहीच काम करीत नाहीत.दोन दोन आयुक्त एकाच वेळी फुकट पगार घेत आहेत.एकतर यांना कारकून किंवा सिपाई मधे कामावर ठेवले पाहिजे किंवा बिनापगारी केले पाहिजे.नगरसेवक आणि आमदारांमध्ये तितके नैतिक बळ असणे आवश्यक आहे.
शहर अभियंता सोनगिरे यांना मी पत्र देऊन माहिती दिली.त्यांना या रस्त्यावर येण्याचे सांगितले तर ते म्हणाले कि आम्ही कलेक्टर साहेबांसोबत मिटींग ला आहोत.अभियंता संजय नेमाडेंनी एमबी लिहून शहर अभियंता ला दिली. अभियंता नरेंद्र जावळे यांनी क्वालिटी सर्टिफिकेट दिले.आणि आयुक्त कुलकर्णी यांनी मक्तेदार सुरज नारखेडे यांना पेमेंट अदा केले.
हा रस्ता फक्त सहा महिन्यांत उखडला.हे तर स्थानिक महिला सुद्धा सांगत आहेत.तर मग,जावळे,नेमाडे , कुलकर्णी यांना कळले नसेल का?पण येथे कमीशन घेऊन एमबी आणि गुंतवत्ता प्रमाणपत्र दिले गेले.या भ्रष्टाचारी नोकरांवर लक्ष ठेवण्यासाठी आमचे नगरसेवक आणि आमदार कमी पडले कि त्यांच्या पापात सामील झाले? निधी आणता.नारळ फोडता.कुदळ मारता , फोटो काढून पेपर ला टाकता.तर मग रस्त्याच्या गुणवत्तेवर का लक्ष ठेवत नाहीत? तर मग नगरसेवक आणि आमदार काय कामाचे? खरी चूक तर आम्ही मतदारांची आहे.अशा चुकीच्या लोकांना निवडून दिले.जे मतदारांशी प्रामाणिक नाहीत.मतदार मात्र नगरसेवकांशी प्रामाणिकपणा दाखवतात.ज्याचे पैसे मिळाले त्यालाच मतदान करतात.कमीशनखोरांशी,लांचखोरांशी प्रामाणिकपणा दाखवणे सुद्धा चुकीचे आहेच.
जळगाव चे कलेक्टर साहेब आता जळगाव मधील रस्त्यांचे साईटवर जाऊन निरीक्षण करीत आहेत.तर मग,जेथे नागरिकांची बोंबाबोंब आहे,तेथे का नाही?बोगस रस्ता बनवणाऱ्या,लांच घेऊन एमबी बनवणाऱ्या,लांच घेऊन क्वालिटी सर्टिफिकेट देणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई का करीत नाहीत?लांच घेणाऱ्या आयुक्त कुलकर्णी वर गुन्हा दाखल केला पाहिजे.असे कोणीही आयुक्त येतो आणि जळगाव लुटून जातो.आमचे नगरसेवक आणि आमदार त्यांची उरली सुरली खाऊन चूप बसतात.हेच चुकीचे आहे.नगरसेवक व आमदार नको त्या लग्नाला जातात, संबंध नसतांना मौत ला जातात .तर मग येथे कामाच्या ठिकाणी का जात नाहीत?हे सुध्दा लांचखोर आहेत.हे मतदारांशी प्रामाणिक नाहीतच.
जळगाव मधील रस्ते न बनणे आणि बनले तर उखडून खराब होणे,याला सर्वस्वी नगरसेवक आणि आमदार जबाबदार आहेत.ज्यांना आम्ही निवडून सभागृहात पाठवतो.खरी मेख हेच आहेत.
जळगाव शहर कोणी बरबाद केले? याचा शोध येथे लागला.नगरसेवक हेच जबाबदार आहेत.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या