Ticker

6/recent/ticker-posts

हिंगणघाट येथील शेतकरी उत्पादक कंपनीस जिल्हाधिकाऱ्यांची भेट


दिक्षा पाटील विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.7378975885


वर्धा : हिंगणघाट येथील कापुस उत्पादक शेतकरी कंपनीस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व कंपनीच्या कामकाजाची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसिलदार सतिश मासाळ, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, बजाज फाऊंडेशनचे महेंद्र फाटे, श्री.चिव्हाने, कृषि विभागाचे श्री.सुतार, श्री.मेश्राम, संतोष कालापाड, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिलेश्वर नक्षीने आदी उपस्थित होते.
भेटीदरम्यान कंपनी अंतर्गत रुजू असलेल्या ट्रायकोकार्ड लॅब, कृषी केंद्र या विषयावर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी ते राबवित असलेल्या उपक्रमांची व कंपनीची माहिती दिली. कृषीउद्योग, त्याबाबत अडचणी व संलग्नित चालू असलेल्या योजनांबद्दल सुध्दा यावेळी माहिती देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या