मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
परभणी :- दिनांक 20 जानेवारी परभणी येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व शिक्षक बांधवांशी संवाद साधला.
आगामी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार प्रा.श्री.किरण पाटील निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच आपले पहिल्या पसंतीचे मत प्रा.किरण पाटील यांनाच द्यावे असे आवाहन केले.
यावेळी आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.आनंद भरोसे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या