अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांची निघणार शोभायात्रा
रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
भंडारा:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विदर्भ प्रांताचे ५१ वे अधिवेशन अकोला येथे २३ ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता होणार आहे. सदर अधिवेशनाकरिता भंडारा जिल्ह्यातील अभाविपचे कार्यकर्ते आज महाराष्ट्र एक्सप्रेसने अकोल्याकरता रवाना झाले. अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध समाजसेविका पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे, प्रमुख अतिथी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री प्रफुल्ल आकांत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनाला विदर्भातील सर्व जिल्ह्यातून एक हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन २२ जानेवारीला सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेडचे सहसंस्थापक डॉ. नंदकुमार पालवे करणार असून, यावेळी प्रमुख अतिथी आमदार रणधीर सावरकर असतील. या अधिवेशनात 'स्वावलंबी' भारत या विषयावर धनंजय भिडे यांचे भाषण होणार आहे. तसेच सायबर क्राइम, शहरी माओवाद, अंतरिक्ष सुरक्षा, आणि विद्यापीठ प्राधिकरणे व अभाविप या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. विदर्भातील शैक्षणिक, सामाजिक, तसेच विदर्भाच्या विकासावर चर्चा होऊन प्रस्ताव पारित करण्यात येईल.
'राष्ट्रीय शिक्षा नीती क्रियान्वयन' या विषयावर परिसंवाद होणार आहे. या अधिवेशनाचे मुख्य आकर्षण शोभायात्रा राहणार आहे. शोभायात्रा २४ जानेवारीला दुपारी ४ वाजता सरकारी बगीचा येथून निघणार आहे. अधिवेशनात जाहीर सभेमध्ये अभाविपच्या छात्र नेत्यांची सामाजिक आणि शैक्षणिक मुद्यांवर भाषणे होतील. या अधिवेशनाच्या नगराला दत्तोपंत ठेंगडी, स्व. शंकरलाल खंडेलवाल, तर प्रदर्शन कक्षाला अभाविपचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात आले. यावेळी विभाग संघटनमंत्री रोशन ठाकरे, जिल्हा संघटनमंत्री आदित्य केंदळे, भंडारा नागरमंत्री नचिकेत बांडेबुचे, कौस्तुभ लांबकाने, नकुल निंबेकर, रुपेश सपाटे, वैष्णवी मांनसरें, ईश्वर रेवंशेटे, मिलिंद मोटघरे, अतुल कावडे, प्रफुल सोमवंशी, आशिष बोरे, चेतन लांजेवार, कांचन कापसे, योगिता राखडे, समृद्ध वैरागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या