रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
नवी मुंबई :- भारतीय बौध्द महासभा नवी मुंबई जिल्हा अंतर्गत भारतीय बौध्द महासभा करावेगाव सीवूड शाखा यांच्यावतीने लूंबिनी बुद्ध विहार, सेक्टर 48 सीवूड नवी मुंबई येथे समता सैनिक दलाचे १ दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या सुरवातीला महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष जयवंत लव्हांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला समता सैनिक दलाचे (डिव्हिजन ऑफिसर) प्रशिक्षक राहुल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला लूंबिनी बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष राम झेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. तसेच प्रशिक्षक आयुनी पौर्णिमा भोसले (मेजर) समता सैनिक दल यांच्या हस्ते अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलीत करून धम्मपिठावरील वातावरण प्रकाशमान व सुगंधी करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय झनके यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले.आणि सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले. स्वागत समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. ह्या वेळी शिबिरात सामील झालेल्या सर्व 42 शिबीरार्थी यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. आणि आदरणीय जयवंत लव्हांडे गुरुजी यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येऊन शिबिराचे उदघाटन करण्यात आले. आणि प्रशिक्षण शिबिराला सुरवात झाली. हा प्रशिक्षणा चा कार्यक्रम सकाळी 8:00 वाजेपासून रात्री 7:00 वाजेपर्यंत सुरु होता. कार्यक्रमाच्या शेवटी शिबिरात सहभागी असलेल्या आयु. शिरीषकुमार बागुल, धम्मशीला वाढवे,धनराज मनवर माधुरी सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर आयुनी. पौर्णिमा भोसले, आयुनी दिवेताई केंद्रीय शिक्षिका , आयु. जीवन वाडते, (सरचिटणीस), प्रकाश मनवर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नवीमुंबई शहर, युवराज सॊनोने सचिव मुंबई प्रदेश आद. जयवंत लव्हांडे जिल्हाध्यक्ष,यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.शेवटी विजय झनके यांनी अध्यक्षीय भाषण करून सर्व प्रशिक्षनार्थी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.आणि भारतीय बौध्द महासभेच्या प्रशिक्षानंतर ध्वज उतरविण्यात आला.ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेचे संरक्षण सचिव आयु. दिपक कांबळे आणि आयु नारायण शिंदे गुरुजी,संतोष वाढवे,संतोष कांबळे,दिपक काळे,गजानन खिल्लारे, स्वप्नील वाढवे, निखिल वाढवे,विनोद मनवर,वसंत काळबांडे उमेश जाधव, घुसळे गुरुजी, मनुरे गुरुजी यांनी अथक परिश्रम केले. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन आयु. संजय झनके सीवूड ( प ) शाखेचे शाखाध्यक्ष यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष वाढवे यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक सरणत्तय घेऊन कार्यकामाची सांगता करण्यात आली.


0 टिप्पण्या