Ticker

6/recent/ticker-posts

सातारा शहरातील विविध विकासकामांसाठी १२ कोटी ६४ लाख

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; नगरोत्थान महा अभियान योजनेतून निधी मंजूर


रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

 सातारा- सातारा शहरातील सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नांतून सातारा शहरातील विविधप्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी १२ कोटी ६४ लाख ५२ हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता महाराष्ट्र नगरोत्थान  महा अभियान अनुदान योजनेतून या निधीला मंजुरी दिली आहे.
             आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा शहरातील विविधप्रकारची विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी मागणीचे पात्र जिल्हाधिकारी यांना दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या नगरोत्थान महा अभियान अनुदान योजनेतून निधी मंजूर करण्यात आला आहे. सातारा शहरातील अजंठा चौक येथील उड्डाण पुलाच्या खालील जागा विकसित करणे यासाठी १ कोटी ८७ लाख २४ हजार रुपये, अजिंक्यतारा किल्ला रस्ता विकसित करण्यासाठी (भाग १) १ कोटी ७१ लाख ९० हजार आणि किल्ल्याच्या दुसऱ्या भागातील रस्ता विकसित करण्यासाठी १ कोटी ७१ लाख ९० हजाररुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
           बॉम्बे रेस्टोरंट चौक ते मंगलमूर्ती रेसिडेन्सी अपार्टमेंट अखेर गटर करणे यासाठी १ कोटी ५९ लाख ८१ हजार, प्रभाग क्र. १४, केसरकर पेठ सि.स.नं. ४६ अ नाला जवळ रिटेनिंग वॉल बांधणे १७ लाख १६ हजार, बगाडे हॉस्पिटल, कुंभारवाडा, शाहू उद्यान अखेर व गुरुवार पेठ कूपर कारखाना ते टोपे मामा दत्त मंदिर अखेर रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी ९९ लाख ५६ हजार, यादोगोपाल पेठ मिरेकर चौक ते बालाजी नगरी व प्रभाग क्र. १९ डॉ. पाटील दवाखाना ते बोगदा रस्ता डांबरीकरण करणे १ कोटी ५० लाख ६२ हजार, साईबाबा मंदिर ते कल्याणी शाळा रस्त्यावरील बॉक्स कल्वर्ट/ पुलाचे बांधकाम करणे ७५ लाख ९५ हजार, सातारा शहरातील भुयारी गटर योजनेमुळे खराब झालेले पश्चिम भागातील रस्ते दुरुस्त करणे यासाठी ७६ लाख ४० हजार आणि सातारा शहरातील मुख्य रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेंट मारणे व रहदारीच्या विविध उपाययोजना करणे यासाठी ५१ लाख ९८ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या