🚩 कनवाळु कृपाळ।
उदास दयाळ मायाळ।
म्हणवितोसी परि केवळ।
गळेकाटू दिसतोसी।।
देवा,तू स्वतःला उदार व मायाळू
म्हणवून घेतोस.......
परंतु प्रत्यक्षात तू स्वतःतसे वागत नाहीस......
तुझ्यासाठी आम्ही कोणते कर्म
केले होते ते सांग,की आमच्यावर
सत्ता करण्यासाठी तू आमचा स्वामी झालास?
तुझ्या कीर्तीचे पवाडे गायले,
परंतु आमच्या भावाला त्यात रंगवून तू आमच्यामध्ये ताटातूट
केलीस........
कान्होबा म्हणतात, तुला भले कसे काय म्हणावे ? आमचा
जीवाभावाचा बंधू तू नेलास......
आमच्यावर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार केला नाहीस......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌺 *पंढरीचा वारकरी* 🌺


0 टिप्पण्या