Ticker

6/recent/ticker-posts

संहारस्य अधर्मस्य उतिष्ठ: ! युज्ज! सारथी अहम तस्य:!!


संहारस्य अधर्मस्य उतिष्ठ: !
   युज्ज! सारथी अहम तस्य:!!
    
उठा!जागे व्हा! जागृत करा!लढा!आपण असे शंभर लोक एकत्र येऊ.ज्यांचा राजकारण हा धंदा नाही.आणि नगरपालिका हे उत्पन्नाचे साधन नाही.
मला विश्वास आहे.अशी माणसे आहेत.जे आपल्या कष्टाने , कौशल्याने कमवतात.गरजेपेक्षा जास्त.तर त्यांना राजकारणातून हात मारण्याची गरजच नाही.तसे मन बनवले पाहिजे.तशी निती बनवली पाहिजे.कि, मी  समाजमान्य,राजमान्य, वैधानिक व्यवसायातूनच कमवू शकतो.कमवतो.चांगले जिवन जगतो.
अशा वृत्ती, प्रवृत्ती ची माणसे आहेत.बुद्धीमान ,ज्ञानी आणि प्रामाणिक सुद्धा.फक्त गावगुंडांचे भय त्यांना खाते.मला भेटतात अशी माणसे.भय बोलून ही दाखवतात.मी सांगतो,मी आहेच कि ,निर्भयपणे बोलणारा.तर मग,कुठे अडवले मला कुणी?उलट ज्यांचे विरोधात मी बोलतो,तेच जास्त प्रेम करतात.आदर करतात.कारण त्यांना जाणिव होते,आपण खरोखरच चुकीचे काम करतो.म्हणून ते मला शत्रू मानत नाहीत.फक्त सवय वेगळी,वाट वेगळी असे समजतात.म्हणतात,मी जरी चुकीचे काम करीत असलो तरी तुमचे काम चांगले समजतो.मानतो.तुम्हाला विरोध करण्याचे माझे मन होत नाही.तुम्हाला अडवण्याचे मानस बनत नाही.कधी कधी वाटते,आपण हे असे चुकीचे काम सोडून तुमच्या सोबत यावे.प्रयत्न करतो.आणि मी येईन तुमच्या सोबत.केंव्हातरी, मला माझ्या कामाचा तिटकारा येईलच.मी तुमच्या सोबत येईनच.पण आज माझी मानसिकता हे सोडण्यास तयार नाही.म्हणून उशीर होईल थोडा.
    भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,मी जरी कौरवांच्या विरोधात अर्जुना तुझे सारथ्य करीत असलो तरीही कोणीही कौरव मला बाण मारत नाहीत.त्यांचा राग,क्रोध,संताप  माझ्याप्रत थंड होतो.
      एक दोन,चार ,दहा,वीस पन्नास ,शंभर अशी बुद्धीमान, ज्ञानी आणि प्रामाणिक  माणसे  एकत्र येऊ शकतात.येतात.पण कोण आधी येतो,ते महत्वाचे आहे.गाव होते.शहर होऊ लागते.लोक पैसा ओतून गर्दी करतात.पण जो आधी आला,आधी  राहिला तो मध्यभागी राहातो.तो वतनदार असतो.खरे वतन त्याचे मानले जाते. तसे स्वातंत्र्याची लढाई ला लोक जमले.आंदोलन केले.चले जाव म्हटले.करो या मरो म्हटले.स्वातंत्र्य मिळाले.पण जे आधी उठले , लोकांना उठवले ते मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव,आझाद,टिळक , सावरकर,नेताजी यांना आम्ही अग्रस्थानी मानतो.यांच्या हिंमतीला सलाम करतो.हिंदुस्तान वतन त्यांचे आहे.तसेच जळगाव मधील गावगुंडांच्या विरोधात जो कोणी आधी उभा राहिल ,येईल,लढा देईल त्याची हिंमत दखलपात्र आहेच.तो खरा जळगावचा.त्याचेच जळगाव.गर्दी झाल्यावर शेळ्या मेंढ्या सुद्धा येतात.म्यांव म्यांव करतात.पण जेंव्हा कोणी नसते तेंव्हा शेर एकटा डरकाळी फोडतो.ते मात्र खरे धाडसाचे, बहादुरीचे ,कौतुकाचे असते.तर मग या सिंहाने हे धाडस,साहस,हिंमत कोणत्या बाजारातून, दुकानातून खरेदी केले असेल? कोणत्या बॅंकेतून कर्जाऊ घेतले असेल? नाही रे!ते आत पिकते.ते त्याच्या आतल्या कप्प्यात निर्माण होते.जेथे त्याच्यातील माणूस मुक्कामाला असतो.जसा देवळातील देव आत गर्भात असतो.त्याचा आपण शोध घेतो, दर्शन घेतो,वंदन करतो.तशाच माणसांचा मी शोध घेत आहे. गाभाऱ्यातील देवाचा.
   असा आतल्या कप्प्यात राहाणारा,साहस,धाडस, हिंमत करणारा माणूस आम्ही शोधत आहोत.सोबत घेत आहोत.जो बदलण्याची हिंमत ठेवतो.सुरूवात करतो.मंगल पांडेंच्या बंदुकीने किंवा भगतसिंगांच्या बॉंब ने ताबडतोब स्वातंत्र्य मिळाले नाही. पण हादरले ते साम्राज्य.तडे गेलेत साम्राज्याला.त्या आवाजाने निद्रिस्त माणूस जागला.उठला.रस्त्यावर आला.आणि आश्चर्य ! हातात शस्त्र नसतांना इंग्रजी फौजेसमोर उभा ठाकला.चल,निघ येथून.आतापर्यंत खूप लुटले.यापुढे नाही लुटू देणार.
        तसे आपण बुद्धीमान , ज्ञानी आणि प्रामाणिक माणसांची फौज बनवत आहोत.जे आधी जागले.नंतर लोकांना जागवले.जागृत जनमंच.जळगांव जागृत जनमंच,धुळे जागृत जनमंच,नाशीक जागृत जनमंच.असा मोठा होत होत महाराष्ट्र जागृत जनमंच.
     काळाची गरज आहे.परिस्थिती तशी निर्माण झाली आहे.समाजाची, राजकारणाची,प्रशासनाची,माध्यमांची,रस्त्यांची ,पाण्याची,शिक्षणाची,आरोग्याची दुरावस्था झाली आहे.कर कर, पैसा पैसा,निधी निधी ,नेता नेता.काहीच कमी नाही.तरीही जळगाव भकास का झाले? कमी आहे नितीमत्तेची.कमी आहे प्रामाणिकपणाची.म्हणून चलती झाली बदमाषांची.तेच बदमाष तुम्हाला नगरपालिका किंवा विधानसभेच्या सभागृहात दिसतात.तेथे हाणामारी करतात.ही कौरवांची फौज सभागृहात धुमाकूळ घालत आहे.कोणीही कोणाचे वस्रहरण करीत आहे.कोणीही कोणाला जनावरांसारखे खरेदी विक्री करीत आहे.खुनी, बलात्कारी माणसे नगरसेवक आहेत.दारु विकणारी,कुंटणखाना चालवणारी  माणसे आमदार आहेत.हे तर दुर्योधन, दुःशासन पेक्षा वाईट आहे.यापेक्षा आणखी वाईट होण्याची वाट पाहातोस का?हस्तिनापूर आणि जळगाव मधे फरक काय उरला ? हे थांबवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सुबुद्धी देत आहेत.हे माणसा, उठ.आणि लढ.तू नाही लढला तरीही मी हे नष्ट करणारच आहे.पण खरी जबाबदारी तुझी आहे.मी तर तुझा सारथी आहे.असे भगवान श्रीकृष्ण सांगतात.
संहारस्य अधर्मस्य उतिष्ठ:!
युज्ज! सारथी अहम तस्य:!

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या