Ticker

6/recent/ticker-posts

हिरापुर थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचयतीवर आरपीआय (आठवले) पक्षाचा झेंडा.


प्रकाश पवार  हे निवडणुकीत प्रचंड मतांनी विजय..................

गौतम सोनवणे.जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद.मो
8308128457

औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील झालेल्या वीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हिरापुर,थापटी तांडा ग्रुप ग्रामपंचायतीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाचे युवक आघाडीचे  मराठवाडा उपाध्यक्ष प्रकाश पवार हे प्रचंड मंतांनी विजय झाले आहे. पैठण तालुक्यातील बंजारा समाजातील प्रकाश पवार हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासुन आरपीआय (आठवले) पक्षाशी एक निष्ठ पदाधिकारी आहेत.पवार हे  यांचा पैठण तालुक्यात दांडगा जनसंपर्क आहे.पवार हे प्रचंड मतांनी विजय झाल्याबद्दल आरपीआय च्या वतीनी भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम दादा,मराठवाडा अध्यक्ष मिलिंद अण्णा शेळके,महाराष्ट्र उपाध्यक्ष दौलत दादा खरात,औरंगाबाद माजी उपमहापौर किशोर थोरात,मराडवाडा प्रदेश संघटक अमोल भैया नरवडे,जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भाऊ इंगळे,संजय ठोकळ,औरंगाबाद शहराध्यक्ष नागराज गायकवाड,प्रविन अप्पा नितनवरे,लक्ष्मण हिवाळे,पैठण तालुका अध्यक्ष जगन्नाथ मामा साळवे,तालुका उपाध्यक्ष गौतम सोनवणे,तालुका उपाध्यक्ष विष्णु खंडागळे,शहराध्यक्ष सुनिल आडसुळ,युवा नेते कृष्णा वाव्हळ,जितु फोटफोडे,सुनिल साळवे,भिमराज ससाने,अरुण ससाने, राहुल सोनवणे,ज्ञानेश्वर माऊली जगधणे आदींनी पवार यांचा सत्कार केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या