जेंव्हा जळगावला जाग येते !
जळगाव शहरातील प्रभाग १६, ईश्वर कॉलनी मधे सेंट लॉरेन्स शाळा ते सिंधी कॉलनी मधे सिमेंटचे रस्ते बनवण्यासाठी आमदार भोळे व गुलाबराव पाटील यांच्यात श्रेय उपटण्यासाठी दोन वेळा तमाशा झाला. याबाबतीत दोन्ही कसलेले कलाकार आहेत.एकच फित दोघांनी स्वतंत्र पणे कापणे आणि एकच फित एकत्र संयुक्तपणे कापण्याचा त्यांचा दहा वर्षाचा अनुभव आहेच.तशी फित येथेही कापण्याचा प्रयोग झाला.फित ही त्यांचीच.कात्रीही त्यांचीच.नारळ ही त्यांचेच.हात ही त्यांचेच.कुदळ ही त्यांचीच.अंथरूण टाकलेली चटई पण त्यांचीच. फक्त माती मात्र स्थानिक लोकांची होती.माती सुद्धा घरूनच टोपलीत भरून आणली असती तर मग,लोकांचा आक्षेप नव्हता.
आधी २१मे ला मामांनी बालाणीला पुढे घालून रस्ता कामाचा नारळ फोडला.बैनर लावले.रस्ता बनवलाच नाही.काम सुरूही केले नाही.पण कुदळ मारून नारळ फोडून मामाने नागरिकांना मुर्ख बनवण्याचे नियोजन केले.मी आणला निधी.मी केली मेहनत.ढोपरे माझे फुटले.कोपरे माझे फुटले.मंत्रीला मी टक्केवारी दिली.तरीही जर कोणी श्रेय घेऊन जात असेल,त्यांचे नांव सेंट लॉरेन्स मधे घालत असेल तर ,हे तर भलतेच होईल.मेहनत करे मामा आणि अंडा खाये गुलाबराव? म्हणून मोठे बैनर लावून भुमिपुजन करून टाकले.मारला कुदळ.खोदली माती.काढले ढेकूळ.फोडला नारळ.निपसली शेंडी.काढले पाणी.वाटले खोबरे.
पण हे खोबरे काही लोकांच्या पचनी पडले नाही.तोंडात घातले पण नरडीत उतरले नाही.लोकांना वांती झाली.इतकी जोरात कि,मामा आणि बालाणीची चादर मैली करून टाकली. फजिती झाली.लोकांना आता संताप आवरणे मुश्किल झाले. लोकांनी मामा आणि बालाणीची तेथेच शाळा केली.सेंट लॉरेन्स शाळेजवळच.तेंव्हा त्यांनी गाशा गुंडाळला. चटई,नारळ,फित, बैनर,कुदळ घेऊन पळाले.च्या ,आयला! लोक खवळले.निघा येथून.
त्या तिर्थस्थळाला मी आज १८मे ला संध्याकाळी सहा वाजता भेट दिली.सोबत,वाणी काका,खडके,सपके , ठाकरे अशी बरीच मंडळी होती.२१मे ला मामा आणि बालाणी यांनी केलेल्या तमाशाचा तेथे कोणताही मागमूस,अवशेष,वास्तूशिल्प,दगड,माती,गोटे,मुर्ती ,हंडा,वाटी असे काहीही आढळून आले नाही.रस्त्याचे काम सुरूही नाही आणि बंद ही नाही.
याच ठिकाणी दुसरे कलाकार गुलाबराव पाटील यांनी पथारी टाकली.त्यांनी त्यांचे टाळ,मृदंग,वीणा,ढोलकी,चोणकी ,नाचे,सोंगाडे,बोंगाडे,हेंगाडे,बेवडे,लफडे,डफडे आणून पुन्हा त्याच रस्त्याचे उद्घाटन करायचा घाट घातला.आता भाऊ चांगली लावणी टाकणार.लोक जमतील.मग वग लावणार.पण प्रेक्षकांना ते आवडले नाही.गुलाबराव पाटील आणि गौतमी पाटील यांचा कार्यक्रम पाहाण्याची सहनशीलता,सहनशक्ती आता सभ्य लोकांमधे उरलेली नाही. कात्रीने फित कापण्याचा,कुदळ मारून ढेकूळ काढण्याचा,नारळ फोडून पाणी काढण्याचा रंगीत संगीत कार्यक्रम लोकांनी उधळून लावला. प्रमुख कलाकार गुलाबराव पाटील यांनी तर नाईलाजाने सहकारी कलाकार मंडळीना सुचना देऊन टाकली.आवरारे आपली पथारी.गुंडाळा सर्व तामझाम.लोक आता शहाणे झाले आहेत.आता आपण त्यांना मुर्ख बनवू शकत नाहीत.आता जळगाव जागे झाले आहे.पळा येथून.
ही जळगाव बदलाची नांदी आहे.एक सामान्य माणूस आणि महिला जेंव्हा मंत्री ला खडे बोल सुनावते आणी मंत्री पथारी आवरून पळ काढतो.आता मामा किंवा महाजन किंवा गुलाबराव चा तमाशा पहायला कोणीही तयार नाही.त्यांची क्रेझ ऊतरली आहे. मागील दहा वर्षात या लोकांनी जळगाव च्या लोकांना मुर्ख बनवले आहे.मतदार जागृत होत आहे.झाला आहे.ही त्याची रंगीत तालीम आहे.
जेंव्हा रायगडाला जाग येते,तेंव्हा स्वराज्य स्थापन होते.जेंव्हा लोकांना जाग येते ,तेंव्हा लोकराज्य स्थापन होते.असे लोकराज्य स्थापन करण्याची वेळ आलेली आहे.नेताजी,तानाजी,बाजी एकत्र येत आहेत.दोन चार सुर्याजी असतीलही.त्यांचा आता टिकाव लागणार नाही.जळगांव बदलते आहे.बदलणार आहे.असा आत्मविश्वास लोकांमधे निर्माण होत आहे.याची झलक मामा आणि गुलाबराव यांना प्रभाग १६ ईश्वर कॉलनीत दाखवून दिली आहे.दारू विकून धर्म होत नाही.टिळा लावून साधू होत नाही.
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.


0 टिप्पण्या