Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


मुंबई :-  दिनांक २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे  मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष श्री. परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञातखोर इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चोपर घेवून जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. मागे मान.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड कडे संशयाची सुई आहे. या हल्ल्याचा  वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनते तर्फे निषेध व्यक्त केला जात आहे
आंबेडकर भवन वरील हल्ला खपवून घेणार नाही. वंचित बहुजन आघाडीचे व तमाम आंबेडकरी जनतेत संतप्त प्रतिक्रिया आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या