Ticker

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्यासाठी पक्षाची भूमिका स्पष्ट करा - दत्ता पाटील हडसणीकर



लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड 
मो 9689821132                     

नांदेड :-  आज युवासेना प्रमुख खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे एका कार्यक्रमा निमित्त हदगांव दौर्‍यावर आले असता.दत्ता पाटील हडसणीकर यांनी त्यांची भेट घेऊन. 

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाची पुर्नविचार याचिका फेटाळून लावण्यात आल्यानंतर.आता
राज्य सरकार कडून लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50 टक्के च्या आतील आरक्षण देण्यात यावे.या मागणी बाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी.या मागणीचे निवेदन दत्ता पाटील यांनी आज शिवसेना युवासेनेचे प्रमुख खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना दिले.तसेच सद्य स्थितीत शिवसेना पक्ष हा राज्यातील सत्तेत सहभागी असून शिवसेनाप्रमुख श्री.  एकनाथ जी शिंदे साहेब हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

त्यामुळे युवासेना प्रमुख म्हणून आपण आमच्या भावना 

पक्षप्रमुख यांच्याकडे मांडून.मराठा समाजाला ओबीसी  प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार ला भाग पाडावे.असे दत्ता पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या