जळगाव शहरातील महानगरपालिकेची सतरा मजली इमारत ही वैभव सांगतात.पण येथे खुर्चीवर ताणून बसणाऱ्या नगरसेवकांना आणि नोकरांना ही घाण सुद्धा वैभव वाटत असावी.ही मंडळी मानव श्रेणीतील नसून वराह श्रेणीतील असावीत.म्हणून त्यांच्या बुडाखाली ही घाण त्यांना आवडते.वराह श्रेणीतील लोकांना या घाणीची चीड येत नाही.कारण घाणीत चरून जाणे इतकेच या वराह मंडळींना समजते.
येथे बसलेले नगरसेवक फक्त कामातून लांचखोरी, रस्ता गटार सफाई मक्तेदारांकडून कमीशनखोरी करतात.तेच पैसे निवडणुकीत मतांचे वाटतात.यांच्याकडून चांगली अपेक्षा करणे चुकीचे आहेच.
आपला आमदार फक्त फित,नाडी , रेबीन कापून पेपरला फोटो छापून आणतात.त्यांचेकडे पाणीसारखा पाण्याचा बक्कळ पैसा कमवण्याचा धंदा असतांना ते आमदार बनतात तरी कशासाठी?हा प्रश्न जळगाव च्या अशिक्षीत, शिक्षीत,अल्पशिक्षित, उच्चशिक्षित नागरिकांना का पडत नाही?कि त्यांना सुद्धा बाटलीची,झाकणांची,पाण्याची,बर्फाची खिरापत मिळत असावी.
मुख्यमंत्री शिंदे जळगाव ला लपत छपत येतात.फक्त चोरांना भेटतात.जर कधी माझ्यासारख्या नागरिकांना भेटले तर हात धरून दाखवतो,ही पहा कोटीकोटीची खोटी खोटी कामे.यासाठीच तुम्ही आमदाराला निधी देतात काय?की तुम्हाला पैसे कमवायचे म्हणून निधी देतात? सवाल तर करणारच! जळगाव ला येऊन पालकमंत्री गुलाबराव आणि आमदार भोळेंना भेटून नक्की काय मतलब असते, मुख्यमंत्रीचे?ही माणसे तर मुंबई ला जाऊन भेटू शकतात.तुमचा शेयर तुम्हाला तेथेही देऊ शकतात?तर मग जळगाव ला येण्याचे प्रयोजन काय? तर मग,या येथे नगरपालिकेच्या सात मजली इमारत जवळ.पहा ही घाण आणि शाबासकी देऊन जा आमदार भोळे आणि महापौर महाजन यांना.घाण केल्याबद्दल एखादा पुरस्कार देऊन जा.
हे जळगाव चे भयानक वास्तव आहे. डोक्याला पावशेर नवरत्न तेल आणि तोंडाला किलोभर टाल्कम लावले की माणूस फॉरवर्ड वाटतो.असा समज काढून टाकण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.ही म्लान,म्लेंच्छ मानसिकता घालवण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सुद्धा कमी पडले आहे.या विद्यापीठातून फक्त पोटार्थी बाहेर पडतात
आपला आमदार दारू विकणारा आहे,आपला नगरसेवक रेतीमाफिया आहे,आपला नगरसेवक भुमाफिया आहे.आपला नगरसेवक ओपन स्पेश बळकावणारा आहे. हे या उच्चशिक्षित व तथाकथित फॉरवर्ड लोकांना खटकत नाही.कदाचित धर्माचे द्युत हारणे आणि द्रौपदीचे वस्त्रहरण होणे सवयीचे झाले असावे.याचा राग फक्त श्रीकृष्णालाच येतो.म्हणून म्हणतो,आता धर्माला ग्लानी आलेली आहे. दुर्जनांचे हनन करणे माझे कर्तव्य आहे.ते कर्तव्य आम्ही करीत आहोत.अर्जुना,भिमा तुम्हाला हे युद्ध लढायचे आहे.मी आहे तुमचा सारथी!
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या