Ticker

6/recent/ticker-posts

भिषण अपघातात ३ ट्रेन एकमेकांना धडकल्याने २५० ठार १००० जखमी असण्याची शक्यता

कोरोमंडल एक्स्प्रेस पटरी वरून घसरली - मदतीसाठी सैन्याची मदत सुरू
 
भवन लिल्हारे उपसंपादक चित्रा न्युज महा. मो.नं.9373472847

मुंबई : ओरिसातील बालासोर येथे झालेल्या रेल्वेच्या विचित्र अपघातात २५० प्रवासी ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन १००० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. अजुनही रेल्वेच्या डब्यात प्रवासी फसले असण्याची शक्यता असुन मृतक व जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारतीय सेना पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावली असुन हेलिकॉप्टरच्या मदतीने मदतकार्य सुरू झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस व मालगाडी एकमेकांना धडकल्याने हा विचित्र पण भयावह अपघात घडला. कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरु हावडा एक्स्प्रेस ह्या दोन्ही गाड्या पटरी वरून घसरल्या आहेत. दोन जून २०२३ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला. ह्या अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख तर जखमींना प्रत्येकी २ लाखांची मदत केंद्र सरकारने जाहिर केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार बालासोर जवळ रेल्वेच्या मुख्य मर्गिकेवार मालगाडी उभी होती. त्याच मर्गिकेवरून भरधाव वेगाने येत असलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचे काही डबे मालगाडीच्या वर चढले. थोड्या वेळातच दुसऱ्या मार्गिकेवरून बंगळुरु हावडा एक्स्प्रेस आली मात्र त्या मर्गिकेवर अपघातग्रस्त गाड्यांचे डबे पडले असल्याने ती ट्रेन सुद्धा अपघातग्रस्त झाल्याने मृतक व जखमींचा संख्या वाढली असुन ह्यात अजुन भर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
"आपल्या अपघातग्रस्त नातेवाईकांची माहिती प्राप्त करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने मदत क्रमांक जाहिर केले असुन 03326382217, 8972073925, 9332392339, 8249591559, 7978418322, 9903370746,044-25330952, 0347-3452, 0347- 34052 ह्या क्रमांकांवर अपघातातील प्रवाशांच्या स्थितीची माहिती देण्यात येणार आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या