Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - २४ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ३ आषाढ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   आषाढ 
पक्ष :    शुक्ल              
तिथी :  षष्ठी (२२.१०) ~ सप्तमी                                                    
वार :    शनिवार
नक्षत्र :   मघा (०७.१०) ~ पूर्वा    
राशी :    सिंह

*कुमार षष्ठी*
कुसुंबा षष्ठी 
कर्दम षष्ठी
*द्वारकाधीश उत्सव*

आंतरराष्ट्रीय परी (Fairy) दिन

१४४१: इटन कॉलेजची स्थापना.
१९३९: सयामचे थायलंड असे नामकरण करण्यात आले.
१९६१: भारतात निर्मित स्वदेशी एच. एफ २४ सुपर सोनिक लढाऊ विमानाने भरारी घेतली.
१९६६: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एयर इंडियाच्या विमान स्वित्झर्लंड देशांतील माउंट ब्लांकमध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे ११७ नागरिक ठार झाले.
१९८२: कर्नाटकातील सर्व शाळांत कन्नड शिकविण्याची सक्ती.
१९९६: मायकेल जॉन्सनचा १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावून विश्वविक्रम.
२००१: आय. एन. एस. विराट ही भारतीय नौदलाची तेव्हाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकी करणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.
२००४: न्यूयॉर्क राज्यात मृत्युदंड असंवैधानिक ठरवण्यात आला.
२०१०: जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.

जन्मदिवस 
१८६२: रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे 
१८६३: प्रसिद्ध महाराष्ट्रीयन इतिहासाचार्य इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाष्यकार आणि वक्ते विश्वनाथ काशिनाथ राजवाडे
१८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी, चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चापेकर.
१८९३: द वॉल्ट डिस्नी कंपनी चे सह-संस्थापक रॉय ओ. डिस्नी 
१८९७: ग्वाल्हेर घराण्यातील प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडीत ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
१८९९ : मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतून सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक
१९०८: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ 
१९२८: मृणाल केशव गोरे, राजकारणी 

मृत्यूदिन 
१५५४: भारतीय इतिहास कालखंडातील प्रसिद्ध वीरांगना गोंडवाना राज्याच्या राज्यकर्त्या राणी दुर्गावती देवी (दिनांकानुसार).

१८८१: हिंदू मठाधिपती, समाजसुधारक व लेखक तसंच, आधुनिक पंजाबी गद्याचे जनक पंडित श्रद्धाराम शर्मा 
१९०८: अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड 
१९१४: वासुदेव गणेश टेंबे उर्फ टेंबे स्वामी किंवा वासुदेवानंद सरस्वती यांचे गरुडेश्वर, बडोदा, गुजरात येथे निधन. (दिनांकानुसार)
१९४७: बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी.
१९९७: ओडिसी नर्तिका, संयुक्ता पाणिग्रही

*।। दास-वाणी ।।* 

निरोपम्य म्हणिजे काये । 
निरालंब म्हणिजे काये । 
निरापेक्षा म्हणिजे काये । 
मज निरोपावे  ।। 

निरोपम्य म्हणिजे उपमा नाही । 
निरालंब म्हणिजे अवलंबन नाही । 
निरापेक्षा म्हणिजे अपेक्षा नाही ।
परब्रह्मासी  ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०९/०१/०७-०८

निरूपम म्हणजे काय ?
निरालंब म्हणजे काय ?
निरपेक्ष म्हणजे काय  ?
स्वामी माझ्या तीन आशंकांचे आपण 
निरसन करावे.

परब्रह्म हे एकमेव आहे.
त्यामुळे ते कशासारखे तरी आहे अशा उपमेने सांगता येत नाही.
आलंबन म्हणजे आधार. त्याला कोणताही आधार लागत नाही. म्हणून परब्रह्म निरालंब आहे.
परब्रह्म निष्काम निरपेक्ष आहे.
ते कोणतीही अपेक्षा करत नाही, पुरवतही नाही. म्हणून ते निरपेक्ष.
परब्रह्म हे एकमेव अद्वितीय असल्याने,
ते दुसऱ्या कशाही सारखे नाही.
त्याच्याविषयी 'यासम हाच' हेच वचन लागू पडते.

आशंकानिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या