Ticker

6/recent/ticker-posts

महामार्ग पोलिस अधीक्षकांच्या हस्ते मृत्युंजय दुतांचा सत्कार


कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- महामार्गावरील अपघातात जखमींना गोल्डन अवर मध्ये तातडीने मदत करून वैद्यकिय मदत पुरवून प्राण वाचविण्यात कामगिरी बजावली अशा मृत्युंजय दुतांना नागपूर परिक्षेत्राचे महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळके यांचेहस्ते मृत्युंजय दूतांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच गोल्डन अवर चे महत्व समजावून सांगण्यात आले. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांनी कळविले आहे. 
            राज्याचे वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून महामार्ग पोलिस मदत केंद्र गडेगाव येथे  मृत्युंजय दुत योजना राबविण्यात येत आहे. या मृत्युंजय दुतांनी अपघातानंतर जखमींना तत्काळ वैद्यकिय सेवा उपलब्ध केली. अशा मृत्युंजय दूतांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात समिर शेंडे करचखेडा, तिजराम मोधनकर, जगदीश मोधनकर खरबी, धीरज भिवगडे गडेगाव, आश्विन वानखेडे खरबी, चंद्रकांत मोथनकर, प्रमोद मोथनकर खरबी, सुमित तिवारी कांद्री, जूनैद शेख सीतासावंगी, दिनेश मांडवतकर सावरबंद, निखिल गजभिये गडेगाव, प्रशांत गोबाडे जांभोरा, कन्हैया करिये सावरी, विजय गभने खापा, अमित वाघमारे शहापूर, चित्तेश्वर हेडाऊ सिहोरा, घनश्याम हारगुडे भंडारा, हेमंत शृंगार पवार अड्याळ, निलेश बांडेबुचे भिलेवाडा, मंगेश साठवने कारधा, रजत कमाने पिंपळगाव, नितीन फेंडरकर चान्ना, मोहन निर्वाण लाखनी, लोकेश बांते भिलेवाडा, खीलोट चचाने भूयार, शंकर तेलमासरे पवनी, महेंद्र ठाकूर कोंढा, कमलेश भोयर पेट्रोलपंप ठाना, धनपाल सेलोकर कोंढा, दिनेश उईके केसलवाडा, धीरज पंचबुद्धे धारगाव, संदीप कावळे मानेगाव, सत्त्याजित कावळे जांभळी, दिनेश उईके केसलवाडा, हेमंत निंबेकर, प्रदीप पचारे लाखनी, अनिल मेश्राम पवनी यांना महामार्ग पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले, पोलिस उपनिरीक्षक नितीन आगासे, महिला पोलिस उपनिरीक्षक रजनी तुमसरे, कल्पना धर्मदास सावरकर आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र गडेगाव येथे कार्यरत सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या