• देवरी रोपवन खड्डे कामावरील प्रकार
• वन रक्षकाचे अक्षम्य दुर्लक्ष
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- सहवनक्षेत्र किटाडी चे अधीनस्त वनरक्षक बीट देवरी येथे मिश्र रोपवन खड्डे खोदकामावरील मजुरांना वनरक्षकाच्या दुर्लक्षित धोरणामुळे २ महिन्यापासून मजुरीची रक्कम बँक खात्यात जमा केली गेली नसल्यामुळे अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर मजुरीची रक्कम देण्यात यावी. अशी मजुरांकडून मागणी होत आहे.
वन परिक्षेत्र अड्याळ, सहवनक्षेत्र किटाडी अंतर्गत असलेल्या वनरक्षक बीट देवरी चे अधिनस्त सानगाव, गोंदी, वाकल, ढीवरखेडा, मरेगाव, पाथरी, नरव्हा, लोहारा, खराशी, खूनारी, पालांदूर, मेंगापुर, कवलेवाडा इत्यादी गावांचा समावेश होतो. देवरी वनरक्षक बीट मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्याती प्राप्त होते. अवैध वृक्षतोडीमुळे वनक्षेत्र नावापुरतेच उरलेले आहे. यावर मात करण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे. या करिता आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १० हेक्टर क्षेत्रात मिश्र रोपवन लागवडीकरीता उपवनसंरक्षक भंडारा यांनी मंजुरी प्रदान केली. वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांचे मार्गदर्शनात वनरक्षक नितीन पारधी यांचे देखरेख व सनियंत्रणात मिश्र रोपवन लागवडीकरीता एप्रिल २०२३ मध्ये खड्डे खोदकाम करण्यात आले. या कामावर देवरीसह आजूबाजूचे गावातील मजूर कामावर होते. मजुरी ४१३ रुपये प्रती दिवस होती. मजुरीची रक्कम मजुरांच्या बँक खात्यात वन विभागामार्फत जमा केली जाणार होती.
मिश्र रोपवनाचे खड्डे खोदकाम अंदाजे २ आठवडे चालले असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर एका मजुराने सांगितले. वनरक्षक नितीन पारधी यांनी प्रती दिवस प्रती मजूर १६ खड्डे सक्तीने खोदकाम करून घेतल्यामुळे खड्ड्यांचे काम रोजंदारी की ठेक्याने असा संभ्रम निर्माण होत आहे. खड्डे खोदकाम पूर्ण होऊन २ महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा वनरक्षकाचे दुर्लक्षामुळे अजूनही मजुरीची रक्कम मजुरांच्या बँक खात्यात जमा झाली नसल्याने लवकरात लवकर जमा करावी. अशी मागणी मजूर वर्गाकडून होत आहे.


0 टिप्पण्या