Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आडवले)पक्षाच्या  वतीने पैठण तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन.

गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
 मो ८३०८१२८४५७.

औरंगाबाद :-नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. व अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी  देण्यात यावी, तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत तात्काळ देण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने पैठण तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील बोंढारा हवेली येथील बौद्ध समाजातील कार्यकर्ता अक्षय भालेराव यांनी भीम जयंती बोंढार गावात  काढली म्हणून अक्षय भालेराव या कार्यकर्त्याची गावातील जातीवादी लोकांकडून खून करण्यात आला आहे. शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या राज्यात बहुजन समाजातील तरुण कार्यकर्त्यांना टार्गेट करून दिवसा ढवळ्या मारले जात आहे. व बहुजन समाजातील  महिलांवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात येत असून राज्य शासनान या जातीवादी प्रवृत्तीच्या गुंडांना पाठीशी घालताना दिसत आहे. राज्यात दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढवत असून याला आळा घालण्यासाठी शासनाने कडक पाऊल उचलून जो कोणी असे अत्याचार करेल त्याला खडक शासन करावे. आणि दि.१/६/२३ रोजी नांदेड येथील बोंढार हवेली या गावातील कार्यकर्ता अक्षय भालेराव याचा खून करण्यात आला आहे त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, व अक्षय भालेराव यांच्या घरातील एका सदस्याला कायमस्वरूपी सरकारी नोकरी देण्यात यावी, तसेच अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 50 लाखाची मदत तात्काळ देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे या मागणीची निवेदन पैठण तहसील तहसीलदार  त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर
 जगन्नाथ मामा साळवे पैठण तालुका अध्यक्ष, भीमराव गायकवाड औरंगाबाद जिल्हा सचिव, गौतम सोनवणे पैठण तालुका उपाध्यक्ष, कृष्णा वाव्हळ पैठण तालुका उपाध्यक्ष, एकनाथ शरणागत पैठण तालुका उपाध्यक्ष, जितू पोटफोडे पैठण शहर सचिव, यांच्यासह बबन पटेकर, धनंजय सरोदे, विशाल भावले, गोविंद वीर, शरद वाव्हाळ, संजू ससाने, रुपेश साळवे, सादिक शेठ, अजय नाचन, करण गायकवाड, कुणाल पंचलोंढे, गोविंद कदम, प्रल्हाद सरोदे, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या