🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - १६ जून
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. २६ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
मास : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण
तिथी : त्रयोदशी (०८.४०) ~ चतुर्दशी
वार : शुक्रवार
नक्षत्र : कृत्तिका (१५.००) ~ रोहिणी
राशी : वृषभ
*शिवरात्री*
*अंगिरस ऋषी जयंती*
*देशबंधू चित्तरंजन दास स्मृतीदिन*
१९०३ : फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
१९११: एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.
१९१४: सहा वर्षांच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका.
१९४७: नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९६३ : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वोस्तोक – ६ या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिली अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.
१९९०: मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
२०१०: तंबाखूला पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला.
जन्मदिवस
१७२३: स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता अॅडम स्मिथ
१९२० : हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
१९५०: मिथुन चक्रवर्ती, अभिनेता
१९६८: आम आदमी पार्टी चे संस्थापक व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
१९९४ : आर्या आंबेकर, मराठी गायिका.
मृत्यूदिन
१९२५ : देशबंधू चित्तरंजन दास, बंगालमधील विख्यात कायदेपंडित व स्वातंत्र्य सेनानी.
१९४४: आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत.
१९७१: बीबीसी चे सह-संस्थापक जॉन रीथ
१९७७: श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभुमीवरील लोकप्रिय गायक, नट.
१९९५: मंगेशकरांच्या मातोश्री शुद्धमती तथा माई मंगेशकर
*।। दास-वाणी ।।*
आतां असो हा दृष्टांत ।
अद्वैतास कैचें द्वैत ।
द्वैतेविण अद्वैत ।
बोलतांच न ये ।।
भासाकरितां भास भासे ।
दृश्याकरितां अदृश्य दिसे ।
अदृश्यास उपमा नसे ।
म्हणोनि निरोपम ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०८/०३/०८-०९
सोने आहे म्हणून अलंकार, समुद्र आहे म्हणून मीठ, बिंबाकरता प्रतिबिंब, मूळ धागा आहे म्हणून वस्त्र दिसते.
हे सर्व दृष्टांत आहेत मूळ गोष्ट सिद्ध करण्यासाठी. दृष्टांतामधे उपमा आली, उपमेय आले. म्हणजे द्वैत. याचा अर्थ दोन वेगवेगळया गोष्टी.
परब्रह्म हे एकमेव असल्याने अद्वैत आहे. त्याच्या ठायी द्वैत असूच शकत नाही. परंतु अद्वैताचे वर्णन करताना मात्र, तात्पुरते का होईना द्वैताचा आधार घ्यावाच लागतो.
आपल्याला एखादा भास होतो तो भासण्यासारखी गोष्ट आधी माहित असते म्हणून भासाकरिता भास होतो.
तसेच दिसण्यासारखे काही असते म्हणून आपण ते पाहातो.
परब्रह्म मात्र अव्यक्त अदृश्य निराकार असते, म्हणून त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. याचाच अर्थ ते निरूपम आहे.
सूक्ष्मआशंकानिरूपण समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या