कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी लाखनी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष पदी रोहित प्रभाकर साखरे रा. मेंढा/पोहरा, तालुका लाखनी यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी नियुक्तीचे श्रेय माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांना दिले असून युवक आघाडीचे लाखनी तालुकाध्यक्ष जितेंद्र बोंद्रे, लाखनी शहर अध्यक्ष धनु व्यास, तालुकाध्यक्ष नागेश पाटील वाघाये यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


0 टिप्पण्या