🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - १५ जून
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. २५ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
मास : ज्येष्ठ
पक्ष : कृष्ण
तिथी : द्वादशी (०८.३०) ~ त्रयोदशी
वार : गुरूवार
नक्षत्र : भरणी (१४.१०) ~ कृत्तिका
राशी : मेष (२०.२०) ~ वृषभ
*गुरू प्रदोष*
*संत निवृत्ति नाथ महाराज समाधी दिन* त्र्यंबकेश्वर, नाशिक.
*जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस* (जागतिक वृद्धजन अवमान विरोध दिन)
*जागतिक पवन दिन*: पवन ऊर्जा आणि तिच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १५ जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात २००७ पासून झाली. २००९ साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारे हा दिवस पाळला जातो.
१८४४: चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
१८६९: महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
१९१९: कॅप्टन जॉन अलकॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातून सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
१९४७: काँग्रेसने भारताची फाळणी करण्यासाठी ब्रिटीश योजनेचा स्वीकार केला.
१९९३: संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
२००१: प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ पटू ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी नॅशनल ‘ए’ विस्डम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम रचला.
२००२: नियर अर्थ ऍस्टेरॉइड २००२ एम.एन. पृथ्वीपासून फक्त १,२०,००० कि.मी. (७५,००० मैल) दूरून गेला.
२००८: लेहमन ब्रदर्स या वित्तीय संस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
जन्मदिवस
१८८४: स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटीशविरोधी बंगाली भारतीय क्रांतिकारक आणि विद्वान तारकनाथ दास
१८९८ : डॉ. ग. श्री. तथा गजानन श्रीपत खैर, शिक्षणतज्ज्ञ आणि गीतेचे अभ्यासक, पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक.
१९०७ : नानासाहेब गोरे, ज्येष्ठ समाजवादी नेते.
१९२८: प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, समिक्षक, शिक्षक. ललित लेखक, उत्तम वक्ता व सूत्रसंचालक साहित्यकार शंकर वैद्य
१९२९ : सुरैय्या जमाल शेख ऊर्फ सुरैय्या, हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका.
१९३३: महाराष्ट्रीयन मराठी लेखिका, समिक्षक, ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा साहित्याच्या साहित्यकार तसंच, महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालक सरोजिनी वैद्य.
१९३७ : अण्णा हजारे, समाजसेवक.
१९५०: भारतीय स्टील उद्योग सम्राट व जगातील सर्वात मोठ्या स्टीलमेकिंग कंपनी आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी मित्तल.
मृत्यूदिन
१५३४: योगी चैतन्य महाप्रभू
१८७८: भारतातील ‘राधा स्वामी सत्संग’ पंताचे संस्थापक शिव दयाल साहब
१९३१: अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, 'संदेश' कार अच्युत बळवंत कोल्हटकर.
१९८३: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ श्री श्री.
१९९६: निर्मलादेवी – पतियाळा घराण्याच्या ठुमरी व दादरा गायिका आणि चित्रपट अभिनेत्री. बॉम्बे सिनेटोन या कंपनीतून त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीस सुरुवात केली. सवेरा (१९४२), कानून (१९४३), गाली (१९४४), चालीस करोड (१९४६), अनमोल रतन (१९५०), चक्रम (१९६८), सती अनसूया (१९७४) हे त्यांचे काही चित्रपट आहेत. सवेरा, कानून, शमा परवाना, बावर्ची, राम तेरी गंगा मैली इत्यादी चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. ९० च्या दशकातील सुपरस्टार गोविंदा हा त्यांचा मुलगा.
२००६: प्रसिद्ध भारतीय गायिका व गीतकार तसंच, पंजाबी लोकगीत गायक, व हिंदी चित्रपट पार्श्वगायिका सुरिंदर कौर
२०२०: भारतीय सैन्य अधिकारी आणि १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बिक्कुमल्ला संतोष सबाबू हे गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट 14 जवळ चीनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले.
*।। दास-वाणी ।।*
ब्रह्म अखंड निर्गुण ।
तेथे इच्छा धरी कोण ।
निर्गुणी सगुणेविण ।
इच्छा नाही ।।
मुळी असेचिना सगुण ।
म्हणौनि नामें निर्गुण ।
तेथें जालेें सगुण ।
कोणेपरी ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०८/०२/०५-०६
अखंड निर्गुण परब्रह्माच्या ठायी
एकोहं बहुस्याम् प्रजायेय ।
असा संकल्प झाला.
एकाकी न रमते । या संकल्पानंतर, सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात.
परंतु इच्छा करणारा, इच्छा हा विषय आणि इच्छा होणे फक्त सगुणामधे म्हणजे द्वैतामध्येच शक्य आहे. निर्गुणास नाही.
जे सगुण साकार नाही ते निर्गुण निराकार अशी परब्रह्माची व्याख्या असल्याने निर्गुणामधे रंग रूप आकार संभवूच शकत नाही. मग हे दृश्य सगुण आले तरी कोठून? असा प्रश्न पडतो.
एकोहं च्या स्फुरणातून मूळमाया, त्यातून गुणमाया किंवा गुणक्षोभिणी झाली. त्यानंतर त्रिगुण आणि पंचमहाभूतांच्या मिश्रणातून दृश्यसृष्टी झाली.
सूक्ष्मआशंका समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या