Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - २५ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ४ आषाढ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   आषाढ 
पक्ष :    शुक्ल              
तिथी :  सप्तमी (२४.२०) ~ अष्टमी                                                     
वार :    रविवार
नक्षत्र :   पूर्वा (१०.१०) ~ उत्तरा     
राशी :    सिंह (१६.५०) ~ कन्या 

*भानू सप्तमी* 
विवस्वत सप्तमी 
*तापी महोत्सव*

जागतिक कोड त्वचारोग दिन

१९१८: कोल्हापूरचे छत्रपती शाहू,  महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.
१९३४: महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बाँबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला
१९७५: पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी देशांतर्गत आणीबाणी जाहीर केली.
१९७५: मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९८३: वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारताने क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा जिंकली.
२००० : मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.

जन्मदिवस 
१८६९: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर 
१९००: भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय 
आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन
१९०४: ब्रिटीश कालीन भारतातील प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी तसंच उत्तरप्रदेश राज्यातील स्वतंत्र उठावाच्या अग्रणी कार्यकर्त्या सुचेता कृपलानी 
१९२४: संगीतकार मदन मोहन 
१९३१: विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे
१९५१: भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका हास्य कलाकार व अभिनेता सतीश शाह 
१९७४: हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर 
१९७८: हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी 
१९८६: अभिनेत्री सई ताम्हनकर 

मृत्यूदिन 
१९२२: बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त.
१९७९: पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर
२०००: मिश्र दुहेरीतील राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या रवीबाला सोमण-चितळे
२००९: अमेरिकन गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता, मायकेल जॅक्सन.

*।। दास-वाणी ।।* 

जे निराभास निर्गुण । 
त्याची काये सांगावी खूण । 
परी ते स्वरूपचि जाण । 
सन्निधचि असे  ।। 

जैसा आकाशीं भासला भास । 
आणि सकळांमधें आकाश । 
तैसा जाणिजे जगदीश । 
सबाहय अभ्यांतरी  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०९/०२/११-१२ 

जे त्रिगुणांच्याही पलीकडे आहे, ज्ञानेंद्रियांनी ज्याचे आकलन होत नाही असे निराभास आहे त्याची नेमकी
जाणण्याची खूण तरी काय सांगणार ?
परंतु हे नक्की की ते ब्रह्म, ते आत्मस्वरूप आपल्या अत्यंत निकट असते.

जसे आकाश नावाची खरे तर नुसती पोकळी आहे. तरी देखील निळसर विस्तीर्ण आकाश आपल्याला दिसते. हा खर तर भास असतो. हे आकाश जसे सर्वच गोष्टींमधे व्यापून असते, त्याच प्रमाणे हा जगदीश्वर प्रत्येक प्राणीमात्राला अंतर्बाह्य व्यापून राहातो. हेच परब्रह्म होय.

ब्रह्मनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या