Ticker

6/recent/ticker-posts

हिंदुजा हॉस्पिटल समोर रुग्ण हक्क परिषदेने साजरी केली राजर्षी शाहू महाराजांची जयंती; रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे दिल्या घोषणा!


रतन जाधव जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी बीड मो.7030271408

 मुंबई -रुग्ण हक्क परिषद कमिटीच्या वतीने दरवर्षी राजर्षी शाहू महाराजांची जयंती उत्साहात साजरी करन्यात येते मात्र यावेळी राजर्षी शाहू महाराजांची जयंती रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी साजरी करण्यात आली. मुंबईतील माहीम येथील हिंदुजा हॉस्पिटल समोर शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
       गेल्या अनेक दिवसांपासून माहीम मधील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत होती. अनेक रुग्णांच्या या संदर्भातील तक्रारी रुग्ण हक्क परिषदेकडे प्राप्त होत होत्या. रुग्ण हक्क परिषद मुंबई कमिटीने हिंदुजा हॉस्पिटल समोर आंदोलन करण्याचे ठरविले होते मात्र मुंबई पोलिसांकडून आंदोलन करण्यास मज्जाव करण्यात येत होता. त्यामुळे रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने हिंदुजा हॉस्पिटल समोर शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी पोलीस अडचण करू शकत नाहीत त्यामुळे अहो राजांची जयंती इतरत्र कुठेही साजरी न करता हिंदूच्या हॉस्पिटल समोरच साजरी करण्याचे ठरवले.
        शाहू महाराजांचे लोक कल्याणकारी राज्य याविषयी मनोगते व्यक्त करतानाच शाहू महाराजांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हिंदुजा हॉस्पिटल ने शाहू महाराजांचा आदर्श घेऊन गरिबांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी यावेळी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत लिंबारे यांनी केली.
          माहीम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर शिरसाठ यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष किशोर जाधव, मुंबई जिल्हा उपाध्यक्ष संजय मगरे आणि बाळू अवसरमल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सलीम नागानी, सुनिता ताई डोळस, राम कदम, प्रितेश नांदिवडेकर, प्रमोद जाधव, नबी शेख, नितीन जाधव, विलास घडशी, समीर शेख, रुपेश मोहिते, सॅमसन जगधने, राजेश तांबे यांच्यासह अनेक रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी -
8956185702

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या