Ticker

6/recent/ticker-posts

दत्ता पाटील हडसणीकर यांना शिवसेना पक्षाकडून मदत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.....

लिंगोजी  कदम    जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो :- 9689821132      

 नांदेड  :- युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर यांचा वाढदिवसानिमित्त निर्धार...
आज युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हदगांव येथील पक्ष कार्यालयात  मराठा सेवक दत्ता पाटील हडसणीकर यांना बोलावून घेऊन.त्यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संदेश पाटील हडसणीकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.या वेळी संदेश पाटील यांनी दत्ता पाटील यांना पेढे भरवून.आपला वाढदिवस साजरा करत.उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.तसेच माझ्या गावातील आमचे बंधू दत्ता पाटील हडसणीकर यांचे राहते घर अवकाळी पावसाने नष्ट झाल्याने.गोर गरीब जनतेचा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाची ओळख असून.मराठा समाजासाठी.दत्ता पाटील यांचे योगदान लक्षात घेऊन.
अशा सामाजिक कार्यकर्त्यांची मदत करणे.हे एक जबाबदार पक्षाचा पदाधिकारी म्हणून.मी शिवसेना पक्षप्रमुख श्री.एकनाथ जी शिंदे साहेब व युवासेना प्रमुख खासदार.डाॅ.श्रीकांत शिंदे साहेब,खासदार.श्री.हेमंत पाटील साहेब,यांना मा.जिल्हाप्रमुख लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता पाटील यांच्या परिस्थिती बद्दल माहीती देवून.दत्ता पाटील यांना पक्षाने मदत करावी.असे विनंती पत्र लवकरच देत असून.दत्ता पाटील यांचा मोडलेला संसार उभा पुन्हा उभा व्हावा.या करीता माझ्याकडून नक्कीच प्रयत्न करणार.असे मनोगत संदेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या