🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २ जून
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. १२ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण
ऋतू : ग्रीष्म
मास : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल
तिथी : त्रयोदशी (१२.५०) ~ चतुर्दशी
वार : शुक्रवार
नक्षत्र : स्वाती (०६.५०) ~ विशाखा
राशी : तुला (२४.३०) ~ वृश्चिक
*शिव राज्याभिषेक दिन*
*शिवराज शक ३५० प्रारंभ*
*रा.स्व. संघाचा हिंदू साम्राज्य दिनोत्सव*
अमेरिकन भारतीय नागरिकत्व दिन
तेलंगाणा निर्मिती दिन
१८००: कॅनडात जगातील सर्वप्रथम कांजिण्याची लस देण्यात आली.
१८६२: अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलीफ़ोनचा शोध लावला.
१८९६: गुग्लियेमो मार्कोनीला रेडिओसाठी पेटंट बहाल.
१८९७: आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेन म्हणाले, माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे.
१९४६: राजा उंबेर्तो-२ ला हटवून इटलीने राजेशाही संपवली स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
१९४७: भारताची फ़ाळणी करण्याची लॉर्ड मांऊटबॅटन यांची घोषणा.
१९४८: शेतकरी कामगार पक्षाची स्थापना
१९४९: दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडून इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
१९५३: इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
१९६६: अमेरिकेचे पहिले अंतरीक्ष यान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले.
१९७९: पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९९९: भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू.
२००६: अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सर्वच संघटनांवर प्रतिबंध लावला.
२०१४: तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.
जन्मदिवस
१९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील
१९३०: भारतीय जनता पक्षाचे नेते व मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर.
" १९५१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री व माजी केंद्रीय ऊर्जा मंत्री व शिवसेना पक्ष सदस्य अनंत गंगाराम गीते.
१९४३: इलियाराजा – गीतकार आणि संगीतकार
१९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी
१९५५: चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम
१९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर
१९८७: भारतीय चित्रपट अभिनेत्री व गायिका सोनाक्षी सिन्हा
मृत्यूदिन
१८८२: इटलीचा क्रांतिकारी ज्युसेप्पे गॅरिबाल्डी
१९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस
१९७८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक प्राण कृष्ण पारिजा.
१९८८- राज कपूर, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
१९९२: मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर
*।। दास-वाणी ।।*
आपलें मूळ बरें शोधिता ।
आपली तों माईक वार्ता ।
पुढे वस्तूच तत्वता ।
समाधान ।।
आत्मा आहे सर्वसाक्षी ।
हे बोलिजे पूर्वपक्षीं ।
जो कोणी सिद्धांत लक्षी ।
तोचि सिद्ध ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०६/१०/१३-१४
मी कोण आहे याचा शास्त्रशुद्ध शोध घ्यायला लागले तर असे लक्षात येते की जो शोध घेणारा देहरूप मी आहे तोच मुळी मायिक आहे.
आत्मरूप मी ला देहरूप मी ने जाणणे म्हणजेच वस्तु किंवा परब्रह्माशी एकरूपता आहे.
पाहावे आपणांसी आपण ।
या नांव ज्ञान ।।
असे म्हटलेलेच आहे.
आत्मा हा सर्वसाक्षी आहे हा फक्त पूर्वपक्ष आहे. सर्वसाक्षी ही तुर्या अवस्था आहे. कठोर साधनेअंती तुर्येच्याही पलीकडे जाऊन जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हाच त्याने लक्ष्य गाठले असे म्हणता येईल.
जीवब्रह्मैक्य साधतो तो सिद्धपुरूष होय. हेच देवशोधन होय.
अनिॆर्वाच्य समास.
🙏 💐 💐 💐 💐 💐 🙏


0 टिप्पण्या