Ticker

6/recent/ticker-posts

कुमारी नंदनी संजय साठवणे १२ वी .वाणिज्य शाखेतून ९९.५०% गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महा.) मो. नं.9373472847

भंडारा- नुतन कन्या ज्यूनिअर कॉलेज भंडारा येथील विद्यार्थीनी कु.नंदिनी संजय साठवणे हिने १२ वी वाणिज्य शाखेत ९९.५० टक्के गुण प्राप्त करीत महाराष्ट्र राज्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला. घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थीनीच्या घरी मा. खासदार - सुनील बा. मेंढे यांनी भेट देऊन अभिनंदन केले. आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या पालकांचे सुद्धा कौतुक केले. पुढील शिक्षणासाठी शक्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. नंदिनीला विचारले असता स्पर्धा परीक्षा देऊन रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याचा मानस तिने व्यक्त केला. 
यावेळी प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. उल्हासजी फडके, मा. कैलासजी कुरंजेकर, मा. मेघश्यामजी झंझाड, मा. जीवनजी सार्वे, मा. घनश्यामजी तरोणे, मा. महादेव साठवणे, वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका सौ. ज्योती श्रीवास्तव, नगरसेविका विनीता कुथे, नंदिनीचे आईवडील, भाऊ, काका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या