कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:-पावसाळा सुरु झाला की सर्व प्रथम ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना रानभाज्यांची चव चाखायला मिळत असते पण यावर्षी पाऊस लांबणीवर गेल्यामुळे रानभाज्या उगवल्या नसल्यामुळे मागणी अधिक असलीतरी बाजारातच उपलब्ध झाल्या नसल्यामुळे सध्यातरी रानभाज्याच्या चवीपासून शौकिनांना मुकावे लागणार आहे.
ग्रामीण परिसरात पावसाळ्याला सुरुवात होताच खापरखुटी,शेरडीरे,आंबाळी भाजी,शेरफरे,बांबूचे वास्टे, लेंगळा भाजी,कानफुटी,भुईआवळा,करटोली व इतर रानभाज्या उगवतात या भाज्या चवीला रुचकर असतात शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टिक आणि औषधीगुणयुक्त असल्याने या भाज्यांना अनन्य साधारण महत्त्व असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगल अथवा डोंगरावर रानभाज्या उपलब्ध होत असल्याने ग्रामीण परिसरातील तसेच आदिवासी पुरुषवर्ग सकाळी जंगल व माळरानात जाऊन रानभाज्या गोळा करतात. त्या खवय्यासाठी बाजारात आणून त्यांची विक्री करत त्यापासून मिळणाऱ्या पैशामध्ये आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात या भाज्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने आदिवासींचा पावसाअभावी रोजगार हिरावला आहे. रानभाज्या डोंगर व जंगलात उगवत असल्याने दिवसेंदिवस या भाज्या दुर्मिळ होऊ लागल्याने पहिल्याच पावसात येणाऱ्या रानभाज्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांचा कल हा रानभाज्या खरेदीकडे असतो. पावसाळ्यातील मिळणारी भाजी ही बिन खताची सेंद्रिय असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात रानभाज्याची विक्री होत असते पण यावर्षी पाऊस लांबणीवर गेल्याने आदिवासी व ग्रामीण भागातील लोकांचा रोजगार हिरावला आहे. या रानभाज्या महाग असल्यातरी बाजारात मोठी मागणी असून पाऊसाअभावी बाजारात रानभाज्याची आवकच नसल्याने ग्राहक राणभाजी खरेदी करिता उत्सुकतेने वाट बघत आहेत. चवीला रुचकर शिवाय आरोग्यसाठी त्या पौष्टीक आणि औषधीयुक्त भाज्यांची चव चाखायला मिळत असते पण यावर्षी पावसाअभावी औषधी, गुणकारी डोंगर भागातील विविध प्रकारच्या सेंद्रिय पालेभाज्या जंगलात फिरून उगवल्या नसल्याने त्याची चव चाखायला मिळाली नाही त्यामुळे शौकिन रानभाज्यांचे प्रतीक्षेत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे


0 टिप्पण्या