Ticker

6/recent/ticker-posts

दिलखुलास कार्यक्रमात मंडळाधिकारी वैशाली दळवी,तलाठी राजू मेरड यांची मुलाखत


प्रतिनिधी चित्रा न्युज
मुंबई,  : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजनांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी करून माणिकदौंडी मंडळ कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामकाजाबद्दल मंडळ अधिकारी वैशाली दळवी आणि तलाठी राजू मेरड यांना राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2022-23 शासकीय कर्मचारी गटातून राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवार दि. 2 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व 'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी घेतली आहे.
                 00000

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या