Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - १९ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २९ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   आषाढ 
पक्ष :    शुक्ल              
तिथी :  प्रतिपदा (११.२०) ~ द्वितीया                                                
वार :    सोमवार
नक्षत्र : आर्द्रा (२०.१०) ~ पुनर्वसु             
राशी :   मिथुन 

*आषाढ मासारंभ*
*गुप्त नवरात्रारंभ (आषाढ)*
देवीच्या दहा महाविद्या रूपांची पूजा केली जाते.
विशेष माहितीसाठी खालील लिंक जिज्ञासूंनी पहावी.
https://astrobix.com/hindumarg/post/postamp/383
*पू. टेंब्येस्वामी पुण्यतिथी* 
*महाकवी कालीदास दिन*
*आषाढस्य प्रथमदिवसे* या त्यांच्या  मेघदूत महाकाव्यातील प्रथम पंक्तीला समर्पित....

जागतिक सांत्वन दिन

१९९९:’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
१९८१: भारताच्या ‘अॕपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९७७:ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
१९६६:’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
१९६१: कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९१२:अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
१८६२:अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.
१६७६:शिवाजी महाराजांनी पश्चातापदग्ध नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.

जन्मदिवस :
१९७६: फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक डेनिस क्रॉवले
१९७०:राहूल गांधी – काँग्रेसचे महा सचिव 
१९५४: ग्वाल्हेरचे महाराजा आणि ग्वाल्हेरच्या स्वर्गीय राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या कन्या व भारतीय राजकारणी यशोधरा राजे सिंधिया
१९४७:सलमान रश्दी – वादग्रस्त व बहुचर्चित लेखक
१९४५:आंग सान स्यू की – नोबेल पारितोषिकविजेत्या ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी नेत्या
१८७७: पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य पांडुरंग चिमणाजी पाटील. ते शतायुषी होते. ले. जनरल शंकरराव पाटील थोरात हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव होते.
१८७१: भारतीय स्वतंत्रता सेनानी व हिंदी राष्ट्रभाषेचे तज्ञ, महान विचारवंत माधवराव सप्रे
१६२३:ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्शिक्षक 
१५९५: सहावे शिख गुरु, गुरु हर गोविंद (तारखेनुसार )

मृत्यूदिन:
२००८: बंगाली पत्रकार बरुण सेनगुप्ता
२०००:माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील व चित्रपट अभिनेत्री 
१९९८:रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक 
१९५६:थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष 
१९३२: मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक रेव्ह. जस्टिन एडवर्ड
१८७७: शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात.
१७४७: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट

*।। दास-वाणी ।।* 

आता असो हे बोलणें । 
घात होतो दुश्चीतपणें । 
दुश्चीचपणाचेनि गुणें । 
प्रपंच ना परमार्थ  ।। 

दुश्चीतपणे कार्य नासे । 
दुश्चीतपणे चिंता वसे । 
दुश्चीतपणे स्मरण नसे । 
क्षण येक पाहतां  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०८/०६/१९-२०

सुचित म्हणजे एकाग्र मन.
दुश्चीत म्हणजे भरकटलेले मन.
इतर सर्व चर्चा आता थांबवूया.
एक नक्की की चंचल मनाइतके घातक काहीच नाही. चित्त एकाग्र नसेल तर त्या व्यक्तीचा प्रपंचही धड होत नाही. परमार्थाची गोष्ट तर फारच दूर राहिली.

चंचल मनामुळे कार्यावर लक्ष केंद्रित होत नाही. साहजिकच कार्यपूर्तीमधे अडथळा येतो. त्यामुळे काळजी वाढतच जाते.आत्मविश्वास दुणावतो.
साध्या साध्या गोष्टींचे ही एका क्षणात विस्मरण होऊन हाती घेतलेल्या कार्याचा सत्यनाश होऊन जातो, मग ते सामाजिक असो की पारमार्थिक.

दुश्चीतनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या