श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्या तरुणांनी माघीतली माफी...................
गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457
औरंगाबाद :-बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीला भेट दिल्यानंतर पैठण तालुक्याचे आमदार औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या पीए नामदेव खरात यांच्या मुलाने प्रणव नामदेव खरात त्याचबरोबर आकाश फासाटे (रा. रहाटगाव) ता.पैठण या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांवर (औरंग्या तुझा बाप आहे का फादर डे निमित्त बापाच्या कबरीवर लेकाची भेट)
अशा खालच्या पातळीची टीका केली ही गोष्ट वंचित बहुजन युवा आघाडी पैठण तालुका अध्यक्ष पंकज भाई गायकवाड यांना कळताच सर्व कार्यकर्ते मिळून पैठण पोलीस स्टेशन येथे गेल्यानंतर दोघेही मुलं वयाने खूप लहान होती. तरी पंकज भाई गायकवाड यांनी समजदारपणा दाखवून गुन्हा दाखल न करता संबंधितांना फक्त समज (नोटीस) देऊन जाहीर माफी नामा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात यावा असं सांगितलं असता पालक मंत्र्यांचे पीए नामदेव खरात व त्यांचा मुलगा प्रणव खरात त्याचबरोबर आकाश फासाटे (रा. रहाटगाव) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांची माफी मागितली व समग्र कार्यकर्त्यांची माफी मागितली. यावेळी तालुका अध्यक्ष पंकज भाई गायकवाड म्हणाले की,यापुढे बाळासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर घराणे विषयी कोणी खालच्या पातळीवर टीका केली तर त्याची गए केल्या जाणार नाही .व सर्वा पालकांना या माध्यमातुन एक संदेश दिला की,सध्या सामाजिक शांततेला गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी विशेष काळजी घ्यावी. समाजात त्यांचे भाष्य फेसबुक, व्टिटर,ईंन्स्टाग्राम,पोष्टने समाजात तेड निर्माण होईल.व अशांतता पसरेल असे कृत्य करु नये.पालकांनी आपली मुले काय करतात याकडे विशेष लक्ष द्यावे.त्यांची एक छोटीशी चुक उद्या मोठा कलहं निर्मान होऊ शकतो,याची दक्षता घ्यावी.
यावेळी सोबत सर्व वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या