• आरटीआय अंतर्गत माहिती न मागताही शुल्क भरण्याचे दिले पत्र
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- कोरडवाहू क्षेत्र विकास अभियानाअंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांत अनियमितता झाली असल्याचे समजताच माहिती घेण्याकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एक पत्रकार गेला असता अशी माहिती देता येत नाही. असे सांगून साधा अर्ज करण्यास प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांनी भाग पाडले. साध्या अर्जास माहिती अधिकाराचे स्वरूप देऊन १८८ रुपये ११ जुलै पर्यंत भरण्याचे निर्देश दिल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन झाले.
तालुका कृषी विभागाचे कामकाज सुचारु पद्धतीने चालावे. या करीत पालांदूर व लाखनी येथे मंडळ कृषी अधिकारी कार्यालय व त्या अधीनस्त अंदाजे २० कृषी सेवक साझे आहेत. या कार्यालयांकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना चालविल्या जातात. सध्या प्रभारी तालुका कृषी अधिकारी म्हणून सुधीर वरकडे कार्यभार सांभाळीत आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मंडळ कृषी कार्यालय पालांदूर मार्फत ३ गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र विकास अभियान राबविण्यात आला. या अभियानाअंतर्गत अनेक योजनांची अमलबजावणी करण्यात आली. यात अनियमितता झाली असल्याच्या माहिती वरून एक पत्रकार मंडळ कृषी कार्यालय पालांदूर येथे जाऊन राबविण्यात आलेल्या योजनांबाबद माहिती विचारणा केली असता पर्यवेक्षक जीभकाटे यांनी माहिती पेनड्राईव मध्ये आहे. उद्या लाखनीत माहिती उपलब्ध करू असे सांगितले. पण १५ दिवस लोटून सुद्धा माहिती दिली नाही. या मुळे शंका बळावली.
१६ जून रोजी प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुधीर वरकडे यांचेकडे जाऊन कोरडवाहू क्षेत्र विकास अभियानाअंतर्गत राबविलेल्या योजनांची माहिती मागितली असता अर्जाशिवाय देता येत नसल्याचे सांगितल्याने त्याच दिवशी माहिती मिळण्यासाठी साधा अर्ज दिला. पण १२ जुलै रोजी जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी यांचे पत्र जावक क्रमांक आस्था/अ-२/मा.अ.०५/२०२३ पंजीबद्ध डाकेने पत्र मिळाले. त्यात माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती उपलब्धतेसाठी शुल्क भरणा करण्याबाबद कळविण्यात आले. त्यात माहिती शुल्कापोटी ८८ रुपये, टपाल खर्च १०० रुपये असे एकूण १८८ रुपये ११ जुलै २०२३ पर्यंत भरणा करण्याचे आदेश देण्यात आले. नमूद तारखेपर्यंत शुल्क भरून चालान सादर न केल्यास ही माहिती उपलब्ध करून घेण्याचे आपणास स्वारस्य नाही. असे समजून आपला अर्ज नस्तीबद्ध करण्यात येईल. अशी पत्रातून तंबी दिली आहे. साध्या अर्जास माहिती अधिकार संबोधल्याने जनमाहिती अधिकारी तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी यांचे माहिती अधिकाराप्रती अज्ञान दिसून येते. यावरून या कार्यालयाचा कारभार कसा चालत असावा. याचेही दर्शन होते म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


0 टिप्पण्या