Ticker

6/recent/ticker-posts

न्याय हक्क आहे.भीक नाही!न्याय हक्क आहे.भीक नाही!

      वकिल होणे मला आवडले असते.पण त्यासाठी वकिल वर कायद्याने खूप बंधने घातली गेली आहेत.कोर्टात वकिल सामान्य माणसा सारखा वागत नाही.घरातील सुनबाई सारखे वागतात.त्यामुळे मनावर दडपण असल्याचे,भीती असल्याचे जाणवते.न्याय हा घटनेतील सत्यता,वास्तव वर अवलंबून असला पाहिजे.न्याय हा कायद्याच्या आधारावर असला पाहिजे.न्यायाधिशाच्या मेहरबानीवर किंवा वकिलांच्या आदब वर नाही.
     गुणवंत सदावर्ते जर कोर्टाच्या बाहेर गात असतील,नाचत असतील तर ते दंडनीय नाही.तरीही सनद सस्पेंड केली.हे चुकीचे आहे.वकिलांनी आक्षेप घेतला पाहिजे.वकीलांचे मनावर न्यायाधिशांचे दडपण दिसते.
कोर्टात पाहातो,वकिल खूप दचकून वचकून असतात.प्रत्येक वेळी वाकून नमस्कार करणे.फक्त विनंती करणे.आग्रह न करणे.अडून न बसणे.जी देईल ती तारीख घेणे.चुकांवर आक्षेप न घेणे.
     येथे न्याय तर फिर्यादीला पाहिजे असतो.पण तो घरी असतो.आणि इकडे आरोपी चकरा मारतो.हे चुकीचे आहे.ज्याला न्याय पाहिजे तो तर प्रत्येक तारखेला हजर पाहिजे.का नाही?मी सेशन कोर्टात असा आक्षेप नोंदवला होता.न्यायाधिश हे फिर्यादी ला जावई सारखी वागणूक देतात.या रावजी.बसा भाऊजी.का?ही चुकीची मानसिकता न्यायाधिशांची आहे.यावर वकिल आक्षेप घेऊ शकत नाही.घेत नाहीत.मी वकिल नसल्याने घेतला.आरोपी सत्तर वेळा कोर्टात हजर झाला.आणि फिर्यादी फक्त दोन वेळा.न्याय कोणाला पाहिजे?फिर्यादीला की आरोपीला?तराजू उलटा धरलेला दिसतो.
   माझ्या अशीलाला न्यायाधिशांनी समन्स,वारंट देऊन बोलवलेले आहे किंवा अटक करून आणलेले आहे.तर मग त्याची सुनावणी आज घेतली पाहिजे.जर सुनावणी घ्यायची नव्हती तर बोलवले का? विनाकारण कोर्टात गर्दी करण्यासाठी?की ,एसटीत किंवा रेल्वेत विनाकारण अडचण निर्माण करण्यासाठी?कामधंदा सोडून,गाय म्हैस,बैल सोडून कोर्टात बोलवले.आम्ही आलो तर घ्या सुनावणी.पण नाही.संध्याकाळ पर्यंत थांबा.पुढची तारीख घ्या.पुन्हा या. येथे ताटकळत,तोंड ताणत बसायला.हा सुद्धा अन्याय आहे.येथे न्याय मिळतो,असे बाहेर प्रवेशद्वारावर लिहिलेले आहे.पण आत अन्याय केला जातो.असा अनुभव रोज येतो.
    जे कायदे बनवले आहेत त्याबाबत अर्ज का करावा?तरीही अर्ज करावा लागतो.जसे , आरोपी किंवा फिर्यादी स्वतः खटला चालवू शकतो.म्हणे अर्ज करा.गरज नाही.मला ही प्रत पाहिजे.गरज असेल तर दिली पाहिजे.अर्ज करून करून कागदांचा ढीग रचला जातो.त्याखाली न्याय दाबला जातो.कागदांच्या ढिगाऱ्यात महत्वाचा कागद सापडतच नाही.मोती गळाला आणि शिंपले हाताला.
    आरोपीला एफआयआर व आरोपपत्र देणे बंधनकारक आहे.पण दिले जात नाही.मागितले तर म्हणे अर्ज करा.का?हे दुकान आहे काय?अर्ज केला तर मिळेल.न्यायाधिशांनी कोणताही प्रश्न करण्याआधी हे विचारले पाहिजे की, तुम्हाला एफआयआर मिळाली का?तुम्हाला आरोपपत्र मिळाले का?त्यातील पुरावे जोडलेले मिळाले का? पण नाही!येथे सरळ विचारले जाते, तुम्हाला गुन्हा कबूल आहे का? यावर मी आक्षेप घेतला की, साहेब,मला गुन्हा माहिती नाही तर कसे काय कबूल, नाकबूल करू?चोरी, बलात्कार,खून वगैरे. तेंव्हा न्यायाधिशांनी पोलिसांना बोलवून सांगितले की,यांना एफआयआर द्या.यांना आरोपपत्र द्या.आणि मला म्हणाले, तुम्ही अर्ज करा.जर हे प्रोसीजर मधे आहे तर अर्जाची गरज काय?
    फिर्यादी व साक्षीदारांना न्यायाधिशांनी आमनेसामने बोलवून प्रश्न केले पाहिजे.पण करीत नाहीत?त्यांना सुद्धा खोटी माहिती,बनवाबनवी खटकली पाहिजे.त्यामुळे अनेक प्रेमकहाणी चे विनयभंग व बलात्कारात रूपांतर झालेले आहे.भ्रष्टाचाराचे खंडणीत रुपांतर झालेले आहे.समाजसेवकांचे गुन्हेगारात रूपांतर झालेले आहे.लांच घेणाऱ्या नोकरांचे फिर्यादीत रूपांतर झालेले आहे.
   वकिल आपल्या अशीलाच्या हिताचे रक्षण करतातच.पण जास्त आदब,अर्ज, विनंती,भीती आढळून येते.
    पोलिसाने फौजदाराला दिवसातून किती वेळा सैल्युट मारावा? फक्त एकदाच.पण हे जाता येता सैल्युट मारतात.तसेच वकिलांनी न्यायाधीशाला किती वेळा वाकून ,झुकून नमस्कार करावा? फक्त एकदाच.पहिल्या भेटीत.पण येथे तर प्रत्येक वेळी आत शिरतांना करतात.प्रत्येक वेळी बाहेर जातांना करतात.न्यायाधिश लक्ष देत नाही,तरी सुद्धा.
   न्याय मागणे हक्क आहे की भीक आहे?खरे तर हक्क आहे.पण भीक मागण्यासारखे दिसते.हे चुकीचे आहे.नेहमी नेहमी मेहरबान ,युवर हॉनर ,युवर हायनेस,माय लॉर्ड म्हणतात.कि म्हणावे लागते.सन्मान असावा पण दडपण नसावे.माझा न्यायालयावर विश्वास आहे.असे न विचारता अनेक वेळा म्हणतात.निर्णय न ऐकताच विश्वास कसा काय बसला?हे भीतीपोटी म्हटले जाते.कि म्हणावे लागते.म्हणजे न्याय मिळवणे हे विश्वासावर अवलंबून असते का?न्यायाधीशांच्या चांगुलपणावर अवलंबून असते का? नाही.मुळीच नाही.न्याय तर घटनेतील कृतीवर किंवा कायद्याच्या आधारावर मिळाला पाहिजे.दिला पाहिजे.
    मी बहादूरपूर येथे नववीत विद्यार्थी असतांना शिक्षकांवर आक्षेप घेतला होता.साळुंखे सर, तुम्हाला इंग्रजी शिकवता येत नाही.मी वर्गात बसणार नाही.तर भावसार मुख्याध्यापकांनी शिक्षक बदलला होता.आज ही मी जाहीर म्हणतो,लिहीतो की भोळे आमदार चोरी करीत आहेत.आमदार जेलमधे जाणार.मंत्री गुलाबराव चोरी करीत आहेत. हाकलले पाहिजे. असे निर्भय वर्तन वकिलांचे असले पाहिजे.साहेब, तुम्ही चुकीचे काम करीत आहात.असे म्हणण्याचे धाडस झाले पाहिजे.
     मी जळगाव कोर्टात आक्षेप घेतला की, सरकारी वकील हेच फिर्यादीची भुमिका करीत आहेत.तर त्यांची साक्ष घेण्याची परवानगी मिळावी.त्यांनी फिर्यादी ला परस्पर परत पाठवले.येऊ नका सांगितले.तर मी आक्षेप नोंदवला.मी वकिल नसल्यामुळे हे धाडस करतो.वकिल असतो तर वाकून वाकून माझे पाठीचे,मानेचे मणके दुखायला आले असते.
     न्यायालयीन कामकाज ब्रिटीश रूलर च्या हितासाठी सुरू झाले आहे.पण आता तर भारतात ब्रिटिश रूलर नाहीत.आम्ही भारतीय आता गुलाम नाहीत.तरीही गुलाम सारखे वागत आहोत.रूलर नसतांना मी गुलाम कसा?मालक नसतांना मी नोकर कसा? कदाचित,आपले पुर्वज दिर्घ काळ गुलामीत जगल्याने आपल्या मनावर तसा परिणाम झालेला असावा.पिढ्या दर पिढ्या ,ही गुलामीची मानसिकता रक्तात पाझरत असावी.पोलिस,कोर्ट, सरकारी नोकर यांचा बडेजाव जसा ब्रिटिश अमदानीत होता तसाच अजून कायम असल्याने भ्रष्टाचार आटोक्यात येत नाही.नागरिकांना संविधानात अधिकार असल्याचे सांगितले जाते .पण प्रत्यक्षात आयपीसी,सीआरपीसी,सरकारी नोकरांची अरेरावी तशीच आहे.म्हणून ही परिस्थिती बिकट झाली आहे.पोलिस मला दहा शिव्या हासडू शकतो.गुन्हा होत नाही.मी एक हासडली तरीही गुन्हा होतो.कोर्ट मला सत्तर वेळा बोलवून ही विचारपूस करीत नाही.पण ते केंव्हा ही येऊ जाऊ शकतात.मी प्रश्न करु शकत नाही.कलेक्टर मला ऑफिसमधून हाकलून देऊ शकतात.पण मी त्यांना माझ्या गावातून, गल्लीतून हाकलून देऊ शकत नाही.मंत्रीने चोरी केली तरी तो सन्माननीय, आदरणीय असतो.चोर असून शासकीय ध्वजारोहण करतो.मी आक्षेप घेतला तरीही गुन्हा ठरतो.हे बदलले पाहिजे.बदलण्याची खूप गरज आहे.म्हणून मी कोर्टातील नव्हे बाहेर जनतेचा वकिल झालो पाहिजे.जनतेचे न्यायालय खूप मोठे आहे.तेच खरे परिणाम कारक आहे.परिणामकारक ठरले पाहिजे.असे लोकशाहीला अपेक्षित आहे.असे संविधानाला अपेक्षित आहे.असे मला अपेक्षित आहे.असे तुम्हाला अपेक्षित झाले पाहिजे.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या