Ticker

6/recent/ticker-posts

आयुक्त, उपायुक्तांनी (शिक्षण) दिली विविध शाळांना भेट

मेहुल भानुशाली जिल्हा प्रतिनिधी ठाणे चित्रा न्यूज मो.न : 7039016364

ठाणे : मिरा भाईंदर महानगरपालिका शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी
महापालिका महत्त्वपूर्ण प्रयत्न करत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता, शाळेची व परिसराची स्वच्छता या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेत दिनांक ०५ जुलै २०२३ रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या निर्देशानुसार अति. आयुक्त संभाजी पानपट्टे व उपायुक्त (शिक्षण) संजय शिंदे यांनी महापालिकेच्या विविध शाळांना भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच शाळेतील परिसरातील स्वच्छता, विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीत देण्यात येणाऱ्या जेवणाची गुणवत्ता तपासणीसाठी आयुक्त यांच्या निर्देशानुसार अति आयुक्त व उपायुक्त (शिक्षण) यांनी विविध शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्याला प्राधान्य देणे हा या पाहणी मागचा उद्देश होता. पाहणी करताना शाळेतील
परिसराची स्वच्छता, वर्गांची स्वच्छता, जेवणाच्या गुणवत्तेबाबत अति.

आयुक्त व उपायुक्त (शिक्षण) यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या विषयाबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा होणार नाही यावर अति.
आयुक्त, उपायुक्त (शिक्षण), शिक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त(शिक्षण), शिक्षक, मुख्याध्यापक यांनी बारीक लक्ष ठेवून नियमित त्याची काळजी घेण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या