• लोकसेवक व लोकप्रतिनिधीत समन्वयाचा अभाव
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- ग्रामीण परिसरात स्थानिक लोकसेवक व लोक प्रतिनिधीमध्ये समन्वय असेल तर विकास आणि नसेल भकास होतो. याचा प्रत्यय मांगली/बांध येथे आला. समग्र शिक्षा योजने अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुलींसाठी मंजूर स्वच्छता गृहाचे बांधकाम काही गैर समजामुळे रखडले असून विद्यार्थिनींना अकारण त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली/बांध आदर्श शाळा म्हणून तालुक्यासह जिल्ह्यातही ख्यातीप्राप्त आहे. लोक सहभागातून या ठिकाणी अनेक उपक्रम राबविले जातात. तसेच शाळेला भौतिक सुविधांसाठी निधीची कमतरताही नाही. येथे इयत्ता १ ते ७ असून १०७ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. त्यात विद्यार्थी ५१ आणि विद्यार्थिनींची संख्या ५६ आहे. शाळेत शिकणारे विद्यार्थी उघड्यावर लघुशंका व शौच करू नये. यासाठी तत्कालीन मुख्याध्यापकाने यु डायस चे माध्यमाने समग्र शिक्षा योजनेतून स्वच्छता गृहाची मागणी केली होती. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३ लाख ३० हजार रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या शौचालय बांधकामास मंजुरी प्रदान करण्यात आली. शाळा समितीचे माध्यमातून स्वच्छता गृह बांधकामास सुरुवात करण्यात आली. यावर तांत्रिक मार्गदर्शन, सनियंत्रण व देखरेखीचे काम कनिष्ठ अभियंता योगेश माटे यांचेकडे सोपविण्यात आले होते. स्लॅब लेव्हल पर्यंत बांधकाम आल्याने शिक्षण समिती पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्याच्या हस्तक्षेपामुळे स्वच्छता गृहाचे बांधकाम बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागणार आहे.
प्रतिक्रिया
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मांगली/बांध येथे स्वच्छता गृहाचे बांधकाम सुरू होते. मुख्याध्यापक व शाळा समिती पदाधिकाऱ्यातील गैरसमजामुळे स्वच्छता गृहचे बांधकाम बंद आहे.
सुभाष बावनकुळे, गट शिक्षणाधिकारी, प. स. लाखनी


0 टिप्पण्या