Ticker

6/recent/ticker-posts

वंचीत बहुजन आघाडीच्यावतीने खामगावात जन आक्रोश मोर्चा !

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


 बुलढाणा - एससी, एसटी, एनटी, ओबीसी, मुस्लीम वंचित बहुजन समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ७ जुलै रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रचंड जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महामहीम राष्ट्रपती यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
गेल्या मागील वर्षापासून एस सी, एस टी, एन टी, ओबीसी, मुस्लीम बचित बहुजन समाजातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात जे गुंड प्रवृत्तीचे लोक या देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असून या प्रवृत्तीच्या लोकांना शासनाने शिक्षा द्यावी.

जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करावे, जरीन खान कुटुंबियांना ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी, नांदेड 
 जिल्हातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकल्यांना फाशीची शिक्षा व्हावी, परळी तालक्यातील कदम कुटुंबावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना कडक शासन व्हावे, रेणापूर येथिल मातंग समाजाच्या बांधवांचा खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागण्याचा समावेश करण्यात आला आहे. सदर मोर्चाला स्थानिक नगर परिषद च्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सुरुवात होऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. येथे तहसीलदार अतुल पाटोळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या मोर्चात वंचित बहुजन आघाडी पार्लमेंट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने, विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महीला आघाडी जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग,तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, कृऊबास उपसभापती संघपाल जाधव, सेवक सभापती राजेश हेलोडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,अतीशभाई खराटे,भीमराव तायडे,गणेश हिवराळे, विजय वानखडे यांचेसह पदाधिकारी व हजारो अन्य अत्याचार ग्रस्त नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.l

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या