• सामाजिक संघटनांचे उपविभागीय महसूल अधिकाऱ्यास निवेदन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:- राजस्व मामला क्रमांक ०४/बी.एम.डी.५४/२०२३ दिनांक १५/०६/२०२३ चे आदेशाला स्थगिती देऊन अर्जदार परसराम भेंडारकर व इतरांना परंपरागत वहिवाटीप्रमाणे रस्ता देण्यात येऊन अभिलेखात नोंदणी ची प्रक्रिया थांबवावी तथा रस्त्याचा वाद संपण्यासाठी संपूर्ण जमीन मोजणीचे आदेश देण्यात यावे. तसेच अर्थकारण करून चुकीचा आदेश पारित करणाऱ्या नायब तहसीलदार शामराव शेंडे यांचेवर दंडात्मक कारवाई करावी. या करिता कैलास गेडाम , प्रा. गजेंद्र गजभिये यांचे नेतृत्वात सोशल फोरम व समता सैनिक दलाचे वतीने साकोली उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांना निवेदन देण्यात आले आहे.
राजस्व मामला क्रमांक ०४/बी.एम.डी.५४ चे अर्जदार परसराम भेंडारकर व इतर शेतकऱ्यांनी तहसीलदार साकोली यांचेकडे गट क्रमांक ५२८, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६ या शेतजमिनीत गट क्रमांक ४७७ व ४७८ वसंत वालोदे यांच्या मालकीच्या शेतातून मागील ४० ते ५० वर्षापासून येण्या-जाण्याचा परंपरागत रस्ता असताना दूषित भावना ठेवून मनोहर बारसागडे यांचे गट क्रमांक ४६९ मधून रस्ता मागणीसाठी अर्ज केला होता. तत्कालीन तहसीलदार गौरव इंगोले यांनी मौका चौकशी करून परंपरागत पद्धतीने सुरू असलेला रस्ता देण्याच्या नायब तहसीलदार शामराव शेंडे यांना सूचना दिल्या होत्या. पण नायब तहसीलदार शामराव शेंडे यांनी गट क्रमांक ४७७ व ४७८ चे मालक वसंत वालोदे यांचे बयान न नोंदविता मंडळ अधिकारी यांच्या अहवालाची नोंद दाखवून परसराम भेंडारकर व इतर शेतकऱ्यांशी अर्थकारण व अधिकाराचा गैरवापर करून मनोहर बारसागडे व इतर शेतकऱ्यांना घातक होईल. असा आदेश पारित केला असे निवेदनात नमूद आहे.
१५ जून २०२३ चे पारित आदेशाप्रमाणे रस्ता मिळाल्यास मनोहर बारसागडे यांना आपले मत मांडण्याची संधी न देता घाईघाई ने गट क्रमांक ४६९ मधील काही बांध्याचे धुरे फोडून रस्ता बनवून शेतीचे नुकसान केले. तसेच त्यांना मानसिक त्रास देण्याचे उद्देशाने रस्त्यास आडकाठी करीत असल्याची पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकरी मनोहर बारसागडे यांनी १५ जून चे आदेशाविरुद्ध उपविभागीय महसूल अधिकारी गौरव इंगोले यांचेकडे अपील दाखल करून चुकीचे आदेश पारित करणाऱ्या नायब तहसीलदार शामराव शेंडे यांचेवर कारवाई करावी. या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम व समता सैनिक दलाचे वतीने निवेदन देण्यात आले आहे. कैलास गेडाम , गजेंद्र गजभिये सर , डी. वाय. बडोले, चिरंजीव बारसागडे , सोनू राऊत, कल्पना सांगोडे , किशोर तरजुले, एन.एम. घोडीचोर, भोला राऊत, नितीन इलमकार, सुरेश मेश्राम, जोती शहारे , नित्यानंद मेश्राम, गुलाबराव नंदेश्वर , बादशहा मेश्राम , प्रतिमा शहारे , कविता राऊत , प्रेमानंद देशपांडे, प्रमोद शिंगाडे , अंजुषा बारसागडे , अंजू राऊत , वसंता टेंभुर्ण , यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या