Ticker

6/recent/ticker-posts

बाल संरक्षणाकडे गावातील यंत्रणांनी संवेदनशीलातेने बघावे


• बालकल्याण समिती सदस्य महेश सातव यांचे प्रतिपादन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324


भंडारा :- समाजातील विकृत मानसिकतेमुळे बालकांशी संबंधित गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. गाव आणि तालुक्यातील यंत्रणांनी बालकांप्रती संवेदना जपत संवेदनशीलतेने बालकांचे संरक्षक करावे. तसेच विधवा महिलांना मदत करावी. असे कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून बालकल्याण समिती सदस्य महेश सातव यांनी दिघोरी पोलिस ठाण्यात पोलिस पाटील कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना विचार व्यक्त केले. 
            भंडारा जिल्हा पोलिस, आरोग्य प्रबोधिनी आणि कैलास सत्यर्थी चिल्ड्रन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने तथा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांचे आदेशानुसार  बाल संरक्षण या विषयावर पोलिस ठाणे दिघोरी येथे एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांचे नेतृत्वात पार पडलेल्या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी जिल्हा बाल समिती सदस्य महेश सातव, प्रमुख अतिथी आरोग्य प्रबोधिनी चे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभने, पोलिस उपनिरीक्षक भोजराम भलावी, पोलिस पाटील संघटनेचे शाखा अध्यक्ष विजय भेंडारकर, प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य प्रबोधिनी कार्यकर्त्यांद्वारा बाल संरक्षणाच्या विविध मुद्द्यांवर उहापोह करण्यात आला. गावात घडणारे बाल विवाह, बाल लैंगिक अत्याचार आणि बाल मजुरी गावातच थांबवता येऊ शकते. या करिता ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती आणि शालेय स्तरावर सखी सावित्री समिती बळकट केल्यास बाल हक्कांचे संरक्षण होईल. असे डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी सांगितले. 
             सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षिततेसाठी निकोप व समता मूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून सखी सावित्री समितीचे गठण करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत बाल लैंगिक शोषणाचे वाढते प्रमाण, बाल मजुरीमुळे शाळाबाह्य होणारे विद्यार्थी यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे सूत्र संचालन व आभार आरती पुराम यांनी मानले. उपस्थित सर्व पोलिस पाटीलांनी समाज बाल विवाह मुक्त करण्याची शपथ घेतली. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पोलिस नायक दिनेश रनदिवे, सतीश पुराम, उमेश वकी, प्रितेश जांभूळकर यांनी अथक परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या