• विविध सामाजिक संघटना सहभागी
• आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- मनीपूर राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यात २ महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार करुन हत्या करण्यात आली. मागील ८४ दिवसांपासून आदिवासींवर अत्याचार सुरू असून सरकार कडून कसलीही कारवाई केली गेली नसल्याचे निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला व लाखनी चे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
मनीपूर राज्यातील कुकी ह्या आदिवासी जमातीच्या लोकांची घरे जाळण्यात येत आहेत. मुलींना रस्त्यावर बंदुकीने मारले जात आहे. महिलांवर खुलेआम अत्याचार होत असले तरी प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. मागील ४ मे २०२३ पासून हा प्रकार सुरू असून दोषींवर कसलीही कार्यवाही केलेली नाही. विशेष बाब म्हणजे मनीपूर च्या राज्यपाल व देशाच्या राष्ट्रपती दोन्ही महिला असताना स्त्रियांवर अत्याचार होणे विश्र्वगुरू म्हणवणाऱ्या देशाला लाजिरवाणी बाब असल्याने या घटनेचा महाप्रज्ञा बुद्ध विहार लाखनी, समता सैनिक दल लाखनी, सार्वभौम युवा मंच जिल्हा भंडारा, क्रांतिज्योती महिला संघटना लाखनी, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, पंचशील बुद्धविहार सावरी, महाप्रज्ञा बुद्ध विहार मुरमाडी, रत्नसंभव बुद्ध विहार गडेगाव, आदिवासी माना जमात युवा विद्यार्थी संघटना चे वतीने मोर्चा कडून कुकी महिलांवर झालेल्या अत्याचाराचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. पिडीत कुटुंबांना १ करोड रुपयांची सनुगृह मदत करावी. कायदा व सुव्यवस्था सांभाळू न शकणाऱ्या मनीपूर सरकार ला तत्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन लागू करावे. प्रशासन व पोलिस विभागातील दोषी अधिकाऱ्यांना तत्काळ बडतर्फ करण्यात यावे. पिडीत कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात यावी. बलात्कार प्रकारांतील कायद्यात सुधारणा करून फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी. ह्या मागण्यांचे निवेदन लाखनी चे तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना पाठविण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे अध्यक्ष सुरेंद्र बनसोड, समता सैनिक दलाच्या स्टाफ ऑफिसर गजेंद्र गजभिये, सार्वभौम युवा मंच चे दीपक जनबंधू, क्रांतिज्योती महिला संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी भिवगडे, नेहाल कांबळे, डॉ. वैष्णवी लेंडे, शर्मिला खंडारे, अक्षरा खोब्रागडे, अंबादास नागदेवे, वर्षा तिरपुडे, आर.सी. फुल्लुके, लीला भीमटे, शीला बागडे, विठोबा कांबळे, तेजराम कोकोळे, रामप्रसाद देशपांडे, शालिक जांभूळकर, अंजली सावरकर, स्वाती पडोळे यांचेसह शेकडो विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व समाजबांधव निषेध मोर्चात सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या